Home Uncategorized *महाराष्ट्रातील देवस्थानच्या जमीन बाबत श्वेतपत्रिका काढाव्या, वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी*

*महाराष्ट्रातील देवस्थानच्या जमीन बाबत श्वेतपत्रिका काढाव्या, वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी*

85
0

*राज्यात सरकार आणि प्रशासनाच्या संगनमताने देवस्थान जमिनीची हेराफेरी करण्यात आली, काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप*

नागपूर, दि. ११–राज्यात देवस्थानच्या जमिनीत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झाला असून त्याची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. हैद्राबाद इनामे व रोख अनुदाने रद्द सुधारणा विधेयक यावर बोलताना वडेट्टीवार यांनी विधानसभेत मागणी केली.

राज्यात नुकताच मुंढवा जमीन प्रकरण झाले.यात सरकारची महार वतनाची जमीन देण्यात आली, कुणावर कारवाई झाली कुणावर नाही यावर नंतर चर्चा होईल. पण अशाच पद्धतीने देवस्थानच्या ५० टक्के जागा या हेराफेरी करून देण्यात आल्या आहेत. प्रशासन आणि राजकीय नेत्याच्या संगनमताने कागदात फेरफार करून जमिनीची विल्हेवाट लावली जाते,हे गंभीर आहे. त्यामुळे देवस्थानच्या जमिनीबाबत श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. अशाच पद्धतीने निजाम कालीन इनाम जमीन ही एका खासदाराने आपल्या ड्रायव्हरच्या नावाने घेतल्याचे वृत्त होतें. १५९ कोटींची जमीन लाटली की घेतली? असे अनेक भ्रष्टाचार होत असल्याने उर्वरित महाराष्ट्रातील जमिनीबाबत सरकारने श्वेतपत्रिका काढावी असे वडेट्टीवार म्हणाले.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हैदराबाद रोख व इनामे सुधारणा विधेयक विधान सभेत मांडले,त्यावर चर्चा सुरू असताना काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी मुद्दा मांडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here