Home Uncategorized *बिच्चारी लाडकी बहिण योजना! ३ भाऊ …विरोधक हजार!* *बहिण सर्वांचीच लाडकी असायला...

*बिच्चारी लाडकी बहिण योजना! ३ भाऊ …विरोधक हजार!* *बहिण सर्वांचीच लाडकी असायला हवी!*

86
0

*सध्याच्या काळात,हिंस्त्र बिबट्या ,भटके कुत्रे आणि लाडकी बहिण योजना जाम चर्चेत आहे…*
● पण जास्त टार्गेटवर आहे..बहिण लाडकी!*
*कुठेही पैशाची कमतरता दिसली ,की लाडकी बहिण योजनेचे पैसे रडारवर येतात, खूप चर्चेत असणारच कारण आजवर ही महिला शक्ती प्रचार, आंदोलने यात दिसत होती पण असं,काही घडलं की या आयाबाया मतदानाला बाहेर पडल्या!*
*आजच्या सरकारच्या जागी जर आजचा विरोधी पक्ष सत्तेवर आला तर तेही हेच करतील , ते ही योजना थांबवण्याचा धाडस करणार नाहीत हे नक्की!*
एक वेगळी रेष या निमित्ताने आखली गेली. आणि बूमरँग होतेय आकसाने टीका करणाऱ्यांवर!*
*ही अशी योजना पुर्वी का नाही आली? हा चर्चेचा विषय असला तरी,केवळ विरोधासाठी विरोध करणं आता थांबायलाच हवं! नाही का?*
*मुद्दा असा की, बहिण माझी, लाडकी योजना विरोधकांच्या रडारवर आहे कारण ही योजना *महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत प्रदान करते, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारते आणि त्यांना आत्मनिर्भर बनवते. विरोधकांना वाटते की ही योजना राजकीय फायद्यासाठी वापरली जात आहे आणि त्यामुळे त्यांना नुकसान होत आहे.*

सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विभागाचा निधी पुन्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग केले गेले म्हणून महाराष्ट्र सरकारचा निषेध! *सामाजिक न्याय विभाग व आदिवासी विभागाचा निधी पुन्हा *मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी वर्ग करण्यात आले म्हणून महाराष्ट्र सरकारचा*निषेध,ॲड. संदेश कोंडविलकरसरचिटणीस ,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांनी केला.*
* विधीमंडळात पुरवणी मागण्या सरकारने सादर केल्या. सामाजिक न्याय विभागाचा ६७१.३५ कोटी रूपये व आदिवासी विभागाचा ५४९.२९ कोटी रुपये निधी लाडकी बहिण योजनेसाठी वर्ग करण्यात आला.*
*मुळातच अनुसूचित जाती/ जमाती साठी अनेक योजनांची निधी अभावी अंमलबजावणी केली जात नाही. अनेक योजना बासनात सरकारने गुंडाळून* *ठेवल्या आहे. शैक्षणिक फी/ स्कॉलर शीप साठी निधी उपलब्ध करून देत नाही.*
महाराष्ट्र सरकार दलित व आदिवासींवर अन्याय करीत आहे. सरकारचा तीव्र निषेध करीत आहोत.*
*सरकारने सामाजिक न्याय व आदिवासी विभागाचा निधी दलित व आदिवासींच्या विकासासाठी वापरावा असे त्यांचे म्हणणे आहे. तो योग्य आहे असे म्हटले आहे.*
*तरीही ज्या महिलांना मदत मिळतेय त्या सर्व जातीच्या आहेत. इथे तळागाळातील महिलांना मिळालेली मदत ती घरासाठी वापरणार आहे. याचा विचार होणे आवश्यक,* *सरकारनेही पैशाची तरतुद त्या -त्या सामाजिक विषयासाठी व घटकांसाठी करणे आवश्यक आहे.*
*पण मुळात विरोधकांचे आरोप आहे आणि एकांगी दृष्टिकोन आहे म्हणावं की काय म्हणावं कळत नाही.*
*पण ही योजना राजकीय फायद्यासाठी वापरली जात आहे.योजनेचा फायदा फक्त सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांना होत आहे. योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांना सत्ताधारी पक्षाच्या प्रचारासाठी वापरले जात आहे. असे अडंरलाईन म्हणणे आहे.*
*तर यावर सरकारचे उत्तर आहे की,*
ही योजना महिला सक्षमीकरणासाठी आहे आणि त्याचा फायदा सर्व महिलांना होत आहे.
योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांची संख्या वाढत आहे आणि त्यामुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारत आहे.
*योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांना सत्ताधारी पक्षाच्या प्रचारासाठी वापरले जात नाही.*
*या योजनेचे फायदे काय तर
महिलांना आर्थिक मदत
*आर्थिक स्थिती सुधारते.* *आत्मनिर्भर बनवले जातेय.महिलांच्या शिक्षा आणि स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो आहे.*

*एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत लाडकी बहिण योजनेला टार्गेट करणाऱ्यांवर चिडून सांगितले की, “ही योजना कधीही बंद होणार नाही. लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला”. शिंदे यांनी विरोधकांवर आरोप केला की, ते योजनेचा विरोध करत आहेत कारण त्यांना महिलांच्या विकासाची चिंता नाही.*
*शिंदे यांनी असेही सांगितले की, “लाडकी बहिण योजना मी आणली आहे, कोणीही मायका लाल बंद करू शकत नाही”. त्यांनी योजनेच्या विरोधात कोर्टात गेलेल्या अनिल वडपल्लीवार यांच्यावरही निशाणा साधला.*
*बहिण माझी लाडकी योजना चे संकल्पक एकनाथ शिंदे आहेत. ही योजना २८ जून २०२४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे आहे.*
*या योजनेअंतर्गत, २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दरमहा ₹१,५०० की आर्थिक मदत दिली जाते. एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, ही योजना कधीही बंद होणार नाही आणि योग्य वेळी ₹२,१०० देण्यात येणार आहेत.*
*योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासनाने भरीव आर्थिक तरतूद केली असून, यापुढेही हात आखडता घेणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.*

*उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लाडकी बहिण योजना ही आमचीच संकल्पना असल्याचा दावा केला आहे. या योजनेचा फायदा १.२५ कोटी महिलांना होणार आहे .*

*या योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देणे आणि त्यांना आत्मनिर्भर बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे. असे हे सरकार म्हणते, तर महिलांच्या अनेक प्रश्नांवर अजुन काम होणे,*महिला कल्याण बरोबर पुरुष कल्याण होणेही आवश्यक आहे.*
*तरुणाईला काम आणि उद्योगात अचुक संधी शिक्षणात सहकार्य मिळणे अत्यावश्यक आहे.*

*स्टार्ट अपमधे किती व कोणत्या स्तरातील तरुणांनी लाभ घेतलाय हे तपासून काम व्हायला हवं.*
*योग्यदिशा आणि समतोल सहकार्य होणे अपेक्षित आहे.*
*हे सरकारातील सगळ्या दादा भाऊ आणि ताईंनी समजुन काम करणे अपेक्षित आणि *विरोधातील आमदारांनीही अशा विधायक कामात चुका दाखवून सुधारणा करत रहाणे महत्त्वाचे ठरेल.*
*बहिण सर्वांचीच लाडकी असायला हवीच!*
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here