सोलापूर
सोलापूर सह महाराष्ट्रातील, बिडी उद्योगात काम करणाऱ्या महिला बिडी कामगारांच्या किमान वेतनाची अंमलबजावणी करण्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली १० सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वा. मुंबई मंत्रालयात, महाराष्ट्रातील प्रमुख कामगार संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
केंद्र शासनाने बिडी कामगारांसाठी निर्धारित केलेले किमान वेतनाची बिडी उद्योग संघ अंमलबजावणी करत नाही., त्यामुळे महाराष्ट्रा कामगार सेनेसह राज्यातील सर्व कामगार संघटना किमान वेतनाची अंमलबजावणी करावी यासाठी शासन व प्रशासन दरबारी निवेदने, आंदोलने व इतर माध्यमातून पाठपुरावा केला., परंतु शासनाने या प्रश्नाकडे अक्षम्य दुर्लक्ष करून बिडी कामगारांवर अन्याय केला आहे., असे असताना सोलापुर हे बहुसंख्य विडी कामगार असलेले शहर असून, या शहरात वीडी कामगारांच्या मजुरीवर पूर्ण कुटुंबीयांचा आधार अवलंबून आहे., म्हणून विडी कामगारांना किमान वेतन मिळालेच पाहिजे, यासाठी कामगार सेनेकडून गेल्या पाच वर्षापासून अखंड आंदोलन चालू आहे., त्याच धर्तीवर कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना वेळोवेळी भेटून किमान वेतन अंमलबजावणी करण्यात यावी.” अशी मागणी केली आहे त्या आधारे १० सप्टेंबर २०२५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली असून, सदर बैठकीत महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी यांच्यासह इतर माजी आमदार नरसय्या आडम , लालबावटा सिटू संघटना, महाराष्ट्र बिडी कामगार संघ पुणे प्रतिनिधी, भारतीय मजदूर संघ परेल मुंबई, आदी संघटनेंना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती, विष्णू कारमपुरी यांनी पत्रकात नमूद केली आहे.
Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *बिडी कामगारांच्या किमान वेतना प्रश्नी कामगार मंत्र्यांनी बोलाविली बैठक





















