Home मुंबई उबाठा गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या जी.डी. सोमानी मेमोरियल स्कूल इंटरनॅशनल स्कूल...

उबाठा गटाच्या भारतीय कामगार सेनेच्या जी.डी. सोमानी मेमोरियल स्कूल इंटरनॅशनल स्कूल या युनिटमधील कामगारांनी शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाची युनियन राष्ट्रीय कर्मचारी सेनेत जाहीर प्रवेश केला.*

107
0

*उबाठा गटाची युनियन भारतीय कामगार सेनेच्या जी.डी. सोमानी मेमोरियल स्कूल इंटरनॅशनल स्कूल या युनिटमधील कामगारांनी तक्रारीकडे होत असलेल्या दुर्लक्ष आणि अन्यायाला कंटाळून शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब पक्षाची युनियन राष्ट्रीय कर्मचारी सेनेत जाहीर रित्या प्रवेश केला.*

*आ. शिवसेना सचिव/प्रवक्ते राष्ट्रीय कर्मचारी सेना अध्यक्ष  किरण पावसकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी.डी. सोमानी स्कूल कफ परेड येथे युनियनच्या नामफलकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच तेथील कामगार महिला कर्मचारी यांच्या होत असलेल्या अन्यायावरती,समस्यावरती ट्रस्टी भावीन शेठ,  सुनील लाहोटी, सी.ए. कौशिक भटाडिया या व्यवस्थापनाशी बैठक घेण्यात आली.*
*तसेच मुंबईमधील प्रसिद्ध अशा स्कूल मानल्या जातात त्या मध्ये जी.डी. सोमानी स्कूल एक आहे. त्यामुळे इतर शैक्षणिक संस्था आहेत,त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी उंबाटाची युनियन आहे, तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्या संस्थेतील सर्व कामगारांना एकत्रित आणणार आणि राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या झेंड्याखाली एक होणार.*
*सोबत राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष  दिलीप नाईक चिटणीस सचिन लिमन दीपक जामदार, कुलाबा शाखाप्रमुख संतोष खरात आणि जी.डी. सोमानी स्कूलचे युनिट अध्यक्ष तुकाराम घुले उपाध्यक्ष संतोष आरते, चिटणीस सुभाष कांबळे आणि सर्व कमिटी मेंबरस अनेक कामगार उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here