विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडून धुळ्यात सरकारी गेस्ट हाऊसमध्ये सापडलेल्या पैशांच्या घबाड प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी विधान परिषदेच्या सभापतींनी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना निलंबित केलं आहे. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या कार्यालयाकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या सभापतींची मोठी कारवाई
विधीमंडळाच्या अंदाज समिती दौऱ्या दरम्यान शासकीय विश्रामगृहा कोट्यावधी रुपयांची रोकड प्राप्त झाल्याप्रकरणी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याप्रकरणी संशयित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांचे निलंबन करण्याचे आदेश सभापती राम शिंदे यांनी गुरुवारी दिले. त्यासोबतच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात येत असल्याची घोषणा राम शिंदे यांच्या कार्यालयाने गुरुवारी केली आहे.



















