Home महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, याप्रकरणी कोणावर कारवाई करणार?*...

रायगड जिल्ह्यातील शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, याप्रकरणी कोणावर कारवाई करणार?* *काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल*चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू, महिला व बालविकास मंत्र्यांची घोषणा*

129
0

*रायगड जिल्ह्यातील शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडला, याप्रकरणी कोणावर कारवाई करणार?*

*काँग्रेस विधी मंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारला सवाल*

*शालेय पोषण आहारात मृत उंदीर सापडले या प्रकरणी स्वतंत्र समिती नेमून चौकशी होणार*

*चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करू, महिला व बालविकास मंत्र्यांची घोषणा*

मुंबई, दि.१२ – रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडी मध्ये बालकांसाठी देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळला. या प्रकरणी पुरवठादार वर कारवाई करणार का? असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बालकांच्या पोषण आहाराचे प्रश्न उपस्थित करण्यात आले. वडखळ इथे ज्या पाकिटात मृत उंदीर सापडले त्याचे नमुने दोन प्रयोगशाळा देऊन त्यांनी तपासणी केली नाही, हे गंभीर आहे. या प्रयोगशाळा या सरकारच्या असून जर ते ही नमुने तपासात नाही तर काय कारवाई करणार? अशी पाकीट जे पुरवठादार बनवतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? पोषण आहारात जर असे अन्न असेल तर तो बालकांच्या आरोग्याला धोका आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणाला जबाबदार धरणार, असे सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री यांनी केली. ही समिती झालेल्या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंत्र्यांनी दिली.

पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदराचे अवशेष सापडले, पण प्रयोगशाळांनी ही नमुने तपासले नाही, या प्रकरणी देखील समिती चौकशी करणार. या प्रकरणात जो कोणी दोषी आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. पुरवठादार यात जबाबदार असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल अस महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here