Home महाराष्ट्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी* *महाविकास आघाडीच्या आमदारांचे आंदोलन*

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी* *महाविकास आघाडीच्या आमदारांचे आंदोलन*

73
0

*शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीसाठी*
*महाविकास आघाडीच्या आमदारांचे आंदोलन*
मुंबई – शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे,
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, आदी मागण्यांसाठी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
कंत्राटदार तुपाशी
शेतकरी उपाशी…
निवडणूक सरली
कर्जमाफी विसरली..
महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कोणतीही घोषणा सरकारने केली नाही. नैसर्गिक आणि सुलतानी संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देत शेतकऱ्यांचा आवाज होऊन आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here