Home मनोरंजन *अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न

*अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न

158
0

*अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखांतर्गत एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी संपन्न*

मुंबई : प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, आयोजित ‘शाखांतर्गत एकांकिका स्पर्धे’ची प्राथमिक फेरी दि १६ जानेवारी २०२५ मुंबई, दि १९ जानेवारी २०२५ पिंपरी चिंचवड, दि २२ जानेवारी नागपूर आणि दि २३ जानेवारी सोलापूर या चार केंद्रांवर संपन्न झाली. प्राथमिक फेरीतून खालील सहा एकांकिका अंतिम फेरीकरिता निवडण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई – राडा
इस्लामपूर शाखा – व्हाय नॉट
नागपूर शाखा – E = mc ^2 – द डार्क एज
सोलापूर – दोरखंड
नाशिक – इश्क का परछा
बीड – विच्छेदन

स्पर्धेसाठी प्राथमिक फेरीत मुंबई केंद्रावर सुरेंद्र वानखेडे (नागपूर), गजानन कऱ्हाळे (शहापूर), पिंपरी चिंचवड केंद्रावर डॉ. अनिल बांदिवडेकर (मुंबई),विलास पागार (मुंबई), नागपूर केंद्रावर चंद्रकांत जाडकर (नाशिक), किरण येवलेकर (पिंपरी चिंचवड) आणि सोलापूर केंद्रावर विजय शिंगणे (नाशिक), शाम अधटराव (मुंबई) यांनी परीक्षण केले, अशी माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली.

स्पर्धा प्रमुख शिवाजी शिंदे तसेच गणेश तळेकर, मनोज डाफळे, सचिन गुंजोटीकर राहुल पवार, विशाल सदाफुले, सुश्मिता सुगदरे, नागेश खोरजुवेकर, साहिल मोहिते, दीपक सावंत यांनी मोलाचे सहकार्य केले.

सदर एकांकिकेची अंतिम फेरी दि ३१ जानेवारी २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल, मुंबई येथे सकाळी १०.०० वाजल्यापासून सुरू होणार असून, स्पर्धेनंतर स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. सदर स्पर्धा ही विनामूल्य असून पहिल्या तीन रांगा राखीव ठेवण्यात येणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here