Home महाराष्ट्र विद्यार्थ्यांनी जिज्ञासा,धैर्य, एकाग्रता,संयमाने यश संपादन करावे – भगवान भोसले

विद्यार्थ्यांनी जिज्ञासा,धैर्य, एकाग्रता,संयमाने यश संपादन करावे – भगवान भोसले

187
0

विद्यार्थ्यांनी जिज्ञासा,धैर्य, एकाग्रता,संयमाने यश संपादन करावे – भगवान भोसले
जे.जे.मगदूम अभियांत्रिकीमध्ये पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
जयसिंगपूर / प्रतिनिधी
येथील डॉ.जे.जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून टाटा मोटर्सचे इलेक्ट्रिक मोटर व्हेहिकलचे डेप्युटी मॅनेजर भगवान भोसले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.जे.जे.मगदूम ट्रस्टचे चेअरमन डॉ.विजय मगदूम होते. प्रमुख उपस्थितीमध्ये ट्रस्टच्या व्हाईस चेअरपर्सन ॲड. डॉ. सौ. सोनाली मगदूम होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करून डॉ.जे.जे. मगदूम व डॉ.प्रभा जे.मगदूम यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून करण्यात आली.
आपले बालपण व शैक्षणिक जीवन अतिशय कष्टप्राय गेले पण आपण जिद्द सोडली नाही.असे प्रमुख पाहुणे भगवान भोसले म्हणाले.जे.जे.मगदूममध्ये शिकत असताना हॉस्टेलवर राहण्याचा अनुभव त्यांनी आवर्जून सांगितला.शिक्षणात कायम प्रथम क्रमांकावर असणारा मी विद्यार्थी, भारत फोर्जमध्ये करिअरची सुरुवात करून आज एवढ्या उच्च पदावरती काम करत आहे. काम करत असताना रतन टाटा, सुधा मूर्ती यांना जवळून पाहता आले व त्यांच्याशी हितगुज करता आले.विद्यार्थिनी जीवनात संशोधन आणि नवीन ज्ञान याबरोबरच जिज्ञासा, तंत्रज्ञानाचा वापर,धैर्य व एकाग्रता साधून संयमाणे यश संपादन केले पाहिजे असा कानमंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
महाविद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे वाचन प्राचार्या डॉ. शुभांगी पाटील यांनी केले.
कॅम्पस डायरेक्टर डॉ.आडमुठे यांनी विद्यार्थ्यांना पुढील आव्हाने विषद करुन सांगितली.
महाविद्यालयात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांच्या समोर एक आदर्श निर्माण करण्यासाठी,माजी विद्यार्थ्यास प्रमुख पाहुणा म्हणून बोलवणे, त्याचा यथोचीत सत्कार करणे व शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा देण्याचं काम आपण आजपर्यंत करत आलो आहे.असे उद्गार ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम यांनी अध्यक्ष भाषणातून काढले.
संस्थेला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला आहे.भगवान भोसले व यांच्यासारख्या देश विदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या महाविद्यालयाचा सिल्याबस बनवू व एक आदर्श शिक्षण प्रणाली करण्याचे काम आपण करू असे सांगण्यास ते विसरले नाहीत.
पारितोषिक वितरण कार्यक्रमांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता अग्रक्रम मिळवलेले विद्यार्थी, स्पोर्ट्स मध्ये सांघिक, वैयक्तिक गुणसंपादन मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. बेस्ट अकॅडमिक्स म्हणून कु. अवंतिका जांभळे हिणे बहुमान पटकावला तर बेस्ट आऊट गोइंग स्टुडंट्स आय.टी.विभागाचा कुमार साईनाथ मोहिते ठरला. कार्यक्रमांमध्ये स्वागत अधिष्ठाता विद्यार्थी कल्याण प्रा.पी. पी.पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार साईनाथ मोहिते यांनी मांडले.कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व डिन्स विभाग प्रमुख व स्टाफ यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here