Home महाराष्ट्र सामान्य लोकांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे हीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

सामान्य लोकांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे हीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा 

224
1

सामान्य लोकांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे हीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अपेक्षा

महारोजगार मेळाव्याला उपसभापती डॉ. गोऱ्हे यांची उपस्थिती.

बारामती  : राजकारणाच्या पलीकडे जाऊन आजचा मेळावा झाला असून यामध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित झालेले होते. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सांगितलं त्याप्रमाणे, आम्ही केवळ राजकारणासाठी राजकारण करत नाही. तर सामान्य लोकांना प्रतिष्ठा व मध्यवर्ती विकासात स्थान मिळावे हीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, आज मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराच्या दृष्टिकोनातून जे उद्योजक आहेत ते उद्योजक आणि प्रशिक्षणार्थीतसेच त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे असे युवक यांच्याबरोबर संवादाच्या संधी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध केली जात आहे. यासाठी कौशल्य, कला, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाचे अभिनंदन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले. तसेच यापूर्वी देखील त्यांनी ठिकठिकाणी असे मेळावे घेतले असल्याचे त्यांनी सांगितले.

आजच्या कार्यक्रमात नोंदणीकृत उद्योजक ३४७, अधिसूचित केलेली रिक्त पदे ५५ हजार ७२ म्हणजे एवढे रिक्त पद वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये असून त्यांना योग्य त्या उमेदवारांची अपेक्षा आहे. उमेदवार नोंदणी ३३ हजार १९ आणि स्टार्टअप स्टॉल २६ अस आजच्या कार्यक्रमामध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेच नुकतच पाच दिवसाच अधिवेशन संपलं त्याच्यामध्ये पेन्शन योजनेच्या संदर्भात सरकारने खूप सकारात्मक निर्णय घेतला आहे, त्याचबरोबर रोजगार, कायदा सुव्यवस्था त्याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झाली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे मेळावे आहेत त्याच्यामध्ये शासन आपल्या दारी सारखा उपक्रम असेल महिला सक्षमीकरण योजना आहे या सगळ्या योजनांच्याबद्दल देखील उहापोह झाला असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

आज जरी उपसभापती म्हणून काम करत असले तरीसुद्धा बारामती मधून सामाजिक कामाची सुरुवात साधारणपणे १९८२-८३च्या सुमाराला झाली असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत नोकरी इच्छुक युवक व युवती, तसेच नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी पुणे विभागातंर्गत पुणे, सोलापुर, सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक व युवतींसाठी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन आज बारामती येथे करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्रीमहोदय मंगल प्रभात लोढा ,उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, खासदार शरद पवार, खा.सुप्रिया सुळे तसेच सौ.सुनेत्रा पवार, संजयकाका घोरपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
——

1 COMMENT

  1. भगवान भोसले यांनी योग्य मार्गदर्शन केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here