नागपूर
गेल्या सहा दिवसांपासून नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होते
यामध्ये विविध विषयांवरती चर्चा करण्यात आल्या. विशेषतः बीड, परभणी येथील घटनांबाबत विरोधी पक्षांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्यावर गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनी दिलेले सविस्तर उत्तर हे अत्यंत महत्त्वाचे होते.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन २०२४ च्या समारोपदिनी विधानभवनाच्या हिरवळीवर विधानसभा व विधान परिषदेच्या सर्व सदस्यांचे एकत्रित छायाचित्रण करण्यात आले.
यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषद सभापती राम शिंदे आणि विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि नवनिर्वाचित मंत्री व सदस्य हजर होते



















