Home मुंबई दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; दसऱ्याला दिवाळीचा...

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; दसऱ्याला दिवाळीचा शिधा

33
0

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; दसऱ्याला दिवाळीचा शिधा

*डोंबिवली -* दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असून, कठीण परिस्थितीतून सावरण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

डोंबिवली येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित शारदीय नवरात्रोत्सवाला शनिवारी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी देवीचे दर्शन घेतले आणि बळीराजाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.

*यंदा दांडीया नाही, भजन संध्या —*
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डीएनसी शाळेच्या मैदानावर हा उत्सव आयोजित केला आहे. यंदा दांडीया न आयोजित करता भजन संध्या, संगीत कार्यक्रम असे साधेपणाने आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवातून जमा होणारा संपूर्ण निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिला जाणार आहे.

*शिवसेनेच्या ३ मोठ्या घोषणा —*
१ *शिलाई मशीन वाटप:* दुष्काळग्रस्त कुटुंबातील महिलांना उदरनिर्वाहासाठी शिलाई मशीन दिले जाणार.
२. *मुलींच्या विवाहाला मदत:* दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत.
३ *दिवाळीचा शिधा:* दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने दिवाळीचा शिधा घेऊन जाणारे मोठ्या संख्येने ट्रक दुष्काळग्रस्त भागात रवाना होणार.

“महाराष्ट्र ही संतांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. नवरात्रोत्सवातून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न होतोय,” असे शिंदे म्हणाले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्थानिक नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधीचे धनादेशही सुपूर्द केले.

*मालवणी गाऱ्हाणे —* यावेळी दुष्काळ दूर व्हावा म्हणून मालवणी भाषेत देवीचरणी गाऱ्हाणे घालण्यात आले, जे उपस्थितांच्या मनाला भावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here