*राज्यात पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी महाविकास आघाडी व महायुतीमध्ये रस्सीखेच*
*✍️ अभ्यासक : अमोल अनंत पवार*
*पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणूक – ज्येष्ठ राजकीय अभ्यासक व विश्लेषक, संस्थापकीय अध्यक्ष – भारतीय पदवीधर प्रतिष्ठान (रजि.)*
*मो. 9833044261*
ठळक मुद्दे –
*# नागपूर पदवीधर मतदारसंघ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक*
*# काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी Vs भाजपचे सुधाकर कोहळे – अटीतटीची लढत*
*# राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बंडखोर अपक्ष नितेश कराळे ठरणार मास किलर?*
*# पुणे शिक्षक मतदारसंघात मंगेश चिवटे यांची माघार – शिंदे सेनेसाठी धोक्याचा इशारा*
राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये –
– भाजपची एक्सपर्ट टीम रिंगणात – शर्थीचे नियोजन
– महाविकास आघाडीला बंडखोरी रोखण्यात अपयश, पण टीम एकत्र कार्यरत
– शिंदे सेनेचा या मतदारसंघाकडे दुर्लक्ष – एक्सपर्ट टीमचा अभाव
—
राज्यात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जवळ आली की माझी स्व. उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्याशी आवर्जून भेट व्हायची. या मतदारसंघाचा मी प्रचंड अभ्यास केला आहे. तीन वेळा प्रयत्न केला, दोन वेळा कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अनुभव म्हणून लढविली. २० वर्षांच्या आमदार मित्रांसमोर लढताना लक्षात आले – काम कितीही चांगले केले तरी अर्थशास्त्राचे गणित जमले नाही तर निवडणूक जिंकता येत नाही.
कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात अनेक सूचना मुख्य निवडणूक आयोगाकडे केल्या. काही मंजूर झाल्या. पदवीधर मतदार नोंदणी ऑनलाईन व्हावी ही सर्वप्रथम आमच्या भारतीय पदवीधर प्रतिष्ठानची मागणी होती, जी केंद्रीय आणि राज्य निवडणूक आयोगाने अखेर मान्य केली. पदवीधर महामंडळ स्थापनेची मागणी मात्र गेल्या चार टर्मपासून प्रलंबित आहे.
सध्याचे चित्र –
महाराष्ट्रात 7 शिक्षक आणि 7 पदवीधर मतदारसंघ आहेत – मुंबई, कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती.
सध्या महाविकास आघाडीकडे सर्वाधिक जागा आहेत.
*विद्यमान आमदार -*
– *नाशिक पदवीधर -* सत्यजित तांबे (अपक्ष – 2023)
– *नाशिक शिक्षक -* किशोर दराडे (शिवसेना शिंदे गट – जुलै 2024)
– *अमरावती पदवीधर -* धीरज लिंगाडे (काँग्रेस – 2023)
– *अमरावती शिक्षक -* किरण सरनाईक (अपक्ष ते शिंदे गट सहयोगी – 2020) _सध्या निवडणूक नाही_
– *नागपूर पदवीधर -* अभिजित वंजारी (काँग्रेस – 2020) _सध्या निवडणूक सुरु_
– *नागपूर शिक्षक -* सुधाकर अडबाळे (काँग्रेस – 2020) _सध्या निवडणूक सुरु_
– *कोकण शिक्षक -* ज्ञानेश्वर म्हात्रे (BJP – 2023)
– *कोकण पदवीधर -* निरंजन डावखरे (BJP – 2024)
– *संभाजीनगर शिक्षक -* विक्रम काळे (राष्ट्रवादी अजित पवार गट – 2023)
– *पुणे पदवीधर -* अरुण लाड (राष्ट्रवादी शरद पवार गट – 2020)
– *पुणे शिक्षक -* जयंत आसगावकर (काँग्रेस – 2020)
– *मुंबई पदवीधर -* ॲड. अनिल परब (शिवसेना UBT – 2024)
– *मुंबई शिक्षक -* ज.मो. अभ्यंकर (शिवसेना UBT – 2024)
नागपूर पदवीधर – सर्वात प्रतिष्ठेची लढत –
या मतदारसंघात 1978 पासून भाजप/जनसंघाचे वर्चस्व होते. नितीन गडकरी यांनी सलग पाच वेळा प्रतिनिधित्व केले. त्यानंतर 2014 मध्ये अनिल सोले विजयी झाले. 2020 मध्ये मात्र काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी हा गड काबीज केला – 61,701 मते Vs भाजपचे संदीप जोशी 42,791 मते.
*2026 ची निवडणूक -*
– *मतदान – 23 ऑक्टोबर, मतमोजणी – 27 ऑक्टोबर*
– *एकूण उमेदवार – 38 (प्रमुख 3)*
– *एकूण मतदार – 2,55,603 (पुरुष 1,47,280, महिला 1,08,301, इतर 22)*
– *जिल्हानिहाय -* नागपूर 1,44,466, चंद्रपूर 32,262, गोंदिया 22,176, वर्धा 21,742, भंडारा 21,349, गडचिरोली 13,608
– *दिव्यांग मतदार – 14,197, 80 वर्षावरील – 855*
– *मतदान केंद्रे – 455*
प्रमुख लढत – सुधाकर कोहळे (भाजप) Vs अभिजित वंजारी (काँग्रेस) Vs नितेश कराळे (अपक्ष – शरद पवार गट बंडखोर). 2020 मध्ये कराळे यांनी सुमारे 7 हजार मते घेतली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः निवडणुकीची धुरा घेतली असून प्रत्येक प्रभागात 30 कार्यकर्त्यांकडून घरोघरी प्रचार सुरु आहे. अनिल सोले यांचे बंड फडणवीस यांच्या भेटीनंतर शमले आहे.
नितेश कराळे यांनी QR कोडद्वारे सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरु केला आहे. त्यांचा फटका भाजपला बसतो की काँग्रेसला, हे निकालातच स्पष्ट होईल.
—
*
























