पूर्वविभाग नवरात्र मध्यवर्ती महामंडळाचे जाहीर आवाहन – इच्छुकांनी अर्ज करा!
*सोलापूर, दि. ०१ ऑक्टोबर २०२६ :-* पूर्वविभाग मध्यवर्ती नवरात्र महामंडळाच्या वतीने पूर्व भागातील सर्व सार्वजनिक नवरात्र मंडळांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.
*सन २०२६ च्या नवरात्र महोत्सवासाठी सुसूत्रता समितीची पदाधिकारी नेमणूक करण्यात येणार आहे.* सोलापूर शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव शांततेत व आनंदात पार पाडण्यासाठी ही सुसूत्रता समिती स्थापन करण्यात येत आहे.
या समितीत काम करण्यास इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आणि देवी भक्तांनी आपले लेखी अर्ज द्यावेत, असे आवाहन *संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज)* यांनी केले आहे.
*अर्ज करण्याची अंतिम मुदत:*
*दि. २ ऑक्टोबर २०२६, शुक्रवार, सायंकाळी ५ वाजेपर्यंत*
*अर्ज जमा करण्याचे ठिकाण:*
पूर्वविभाग नवरात्र महोत्सव महामंडळ, पद्मशाली चौक येथील कामगार सेना कार्यालय, सोलापूर.
इच्छुक अर्जासोबत आपले परिचय पत्र जोडावे, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) आणि सेक्रेटरी श्रीनिवास चिलवेरी यांनी केले आहे.
#Solapur #Navratri2026 #Purvavibhag #MaiMedia24






















