Home मुंबई गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांत गेल्या ५ ते १० दिवसांत ५ नागरिकांचा मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांत गेल्या ५ ते १० दिवसांत ५ नागरिकांचा मृत्यू झाला असून, दुसरीकडे हत्तींकडून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.- विजय वडेट्टीवार

8
0

गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांत गेल्या ५ ते १० दिवसांत ५ नागरिकांचा मृत्यू झाला असून, दुसरीकडे हत्तींकडून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.- विजय वडेट्टीवार

वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या मजुरांचे गेल्या पाच महिन्यांपासून वेतन थकीत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. आवश्यक निधीअभावी निर्माण झालेल्या या समस्यांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

या गंभीर प्रश्नांसंदर्भात राज्याचे वनमंत्री मा. श्री. गणेश नाईक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांसोबत पुढील ७ ते ८ दिवसांत बैठक घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसह शेतकऱ्यांच्या नुकसानीवर आणि थकीत वेतनाच्या प्रश्नावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल.

जंगलांचे रक्षण करणाऱ्या नागरिकांचे जीव सुरक्षित ठेवणे, शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करणे आणि वनमजुरांना त्यांच्या हक्काचे वेतन वेळेत मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे. या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here