Home मुंबई महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या सरचिटणीसपदी आमदार प्रसाद लाड

महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या सरचिटणीसपदी आमदार प्रसाद लाड

40
0

महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या सरचिटणीसपदी आमदार प्रसाद लाड

*मुंबई, ३० सप्टेंबर:* कांदिवली येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील गेली ७० वर्षे कार्यरत असलेल्या मान्यताप्राप्त *महिंद्रा अँड महिंद्रा वर्कर्स युनियनच्या सरचिटणीसपदी आमदार प्रसाद लाड* यांनी आज पदभार स्वीकारला.

श्रमिक उत्कर्ष सभेच्या नेतृत्वाखालील पॅनेलला कामगारांचा व्यापक पाठिंबा मिळाल्यानंतर ही जबाबदारी आमदार लाड यांच्यावर सोपविण्यात आली.

*काय म्हणाले आमदार लाड?*

“गेली पाच वर्षे श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून कामगारांचे प्रश्न मार्गी लावताना कामगारांनी जो विश्वास दाखवला, त्याच विश्वासाची ही जबाबदारी आहे. अशा ऐतिहासिक संघटनेची जबाबदारी मिळणे हा सन्मान आहे. कंपनीचा विकास आणि कामगारांचे कल्याण यांचा समतोल साधण्यासाठी कटिबद्ध राहू.”

श्रमिक उत्कर्ष सभेचे अध्यक्ष म्हणून आमदार लाड गेल्या काही वर्षांपासून कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्यरत आहेत. BEST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबतही त्यांनी विधान परिषदेत पाठपुरावा केला आहे.

कांदिवली कारखान्यात सुमारे ६ ते ६.५ हजार कामगारांना रोजगार मिळत असून, त्यांच्या रोजगाराची सुरक्षितता, कल्याणकारी सुविधा आणि भविष्यातील संधी यासाठी रचनात्मक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रमिक उत्कर्ष सभेचे भालचंद्र साळवी, बाबा कदम, अध्यक्ष सुहास गोरे, रोहित केणी, महेश सावंत, श्रीकांत शेट्टी, संजय दरेकर, अमेय लाड, माणिक मोरे, देवेंद्र खैरे तसेच युनियनच्या कार्यकारिणीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.

#MahindraAndMahindra #PrasadLad #WorkersUnion #Kandivali

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here