Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर गुरुदत्त शुगर्स’च्या छावणीत एक हजार पुरग्रस्तांना आधार माधवराव घाटगे यांचे दातृत्व; चारशे...

गुरुदत्त शुगर्स’च्या छावणीत एक हजार पुरग्रस्तांना आधार माधवराव घाटगे यांचे दातृत्व; चारशे जनावरांचीही सोय

166
0

‘गुरुदत्त शुगर्स’च्या छावणीत एक हजार पुरग्रस्तांना आधार
माधवराव घाटगे यांचे दातृत्व; चारशे जनावरांचीही सोय

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यात नदीकाठच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पूरग्रस्तांचे स्थलांतर सुरू आहे. अशा कठीण काळात टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील श्री गुरुदत्त शुगर्सच्या कार्यस्थळावर तालुक्यातील पंधराहून अधिक गावातील सुमारे १०५० पूरग्रस्तांसह ४०० जनावरांची छावणी सुरू करून त्यांना आधार देण्याचे काम केले जात आहे. गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे यांनी शासनाच्या मदतीविना स्वखर्चाने पूरग्रस्तांची छावणी सुरू करून दिलासा देण्याची भूमिका कौतुकास्पद ठरली आहे.
शिरोळ तालुक्याला २००५ पासून सातत्याने महापुराचा भटका बसत आहे. अशा आपत्तीच्या काळात गुरुदत्त शुगर्सच्या माध्यमातून माधवराव घाटगे यांनी माणुसकीच्या भावनेतून छावणी सुरू केली आहे. पाच दिवसांपासून याठिकाणी एक हजाराहून अधिक पूरग्रस्त आपल्या कुटुंबासह जनावरांना घेऊन छावणीचा आधार घेतला आहे. श्री घाटगे आणि एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांनी छावणीतील पूरग्रस्त आणि जनावरांची हेळसांड होऊ नये यासाठी जातीनिशी लक्ष घातले आहे. पूरग्रस्तांना सकाळचा चहा नास्ता दोनवेळचे जेवण, त्यांचे आरोग्य, जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून दिला आहे.
२००५, २०१९, २०२१ आणि यावर्षी तालुक्याला महापुराने घेरले असताना गुरुदत्त अनाथांचा नाथ बनून मदतीसाठी हिमालयाप्रमाणे उभा राहिला आहे. गेले काही दिवस कोसळणारा मुसळधार पाऊस व धरणातून सोडण्यात येणारे पाणी यामुळे शिरोळ तालुक्यावर महापुराचे गंभीर संकट ओढवले होते. चिंतातुर झालेल्या पूरग्रस्तांनसाठी छावणी उभा करून मोठा आधार देण्याचे काम गुरुदत्त कारखान्याने केले.
गुरुदत्त कारखान्याच्या परिसरातील बस्तवाड, अकिवाट, राजापूर, राजापुरवाडी , खिद्रापूर , जुने दानवाड , नवे दानवाड ,कुरूंदवाड , चंदूर आदी गावातील १०५० हून अधिक पूरग्रस्त व चारशे जनावरांना या छावणीत आधार मिळाला आहे. ‘गुरुदत्त’च्या मदतीबदल पूरग्रस्तांनी कारखान्याचे चेअरमन माधवराव घाटगे यांचे आभार मानले . एक्झीक्युरीव्ह डायरेक्टर राहूल घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी पूरग्रस्तांसाठी परिक्रम घेत आहेत.

*चौकट*
….

३० एकरातील ऊस चाऱ्यासाठी
छावणीतील चारशे जनावरांना मुबलक चारा आणि त्यांचे आरोग्य जपले जात आहे. ३० एकरातील ऊस उपलब्ध करून दिला आहे. कारखान्याचे दोनशे अधिकारी आणि कर्मचारी पुरग्रस्तांच्या सोयीसाठी परिश्रम घेत आहेत.
….

सामाजिक कार्य व गुरुदत्त शुगर्स हे एक समिकरण तयार झाले आहे. संकट काळात मानवतेच्या भावनेतून नागरिकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. त्यामुळे आम्ही २००५, २०१९, २०२१ व यावर्षी आम्ही कारखान्याच्या माध्यमातून शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता पूरग्रस्तांसाठी निवारा छावणी उभा करून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे. पुढील काळातदेखील नैसर्गिक आपत्तीच्या व इतर सामाजिक कार्यात गुरुदत्त शुगर्स नागरिकांच्या पाठिशी निश्चितपणे उभा राहिल.

-माधवराव घाटगे (चेअरमन – गुरुदत्त शुगर्स)

फोटो लाईन –
गुरुदत्त शुगर्स च्या कार्यस्थळावर उभारलेल्या छावणीतील पूरगस्तांना चेअरमन माधवराव घाटगे यांनी स्वतः जेवण वाढून त्यांना आधार देण्याचे काम केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here