Home मुंबई अपुऱ्या पावसाने पिकांचे नुकसान -* *बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणार; मंत्री...

अपुऱ्या पावसाने पिकांचे नुकसान -* *बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणार; मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांचे सर्वेक्षणाचे आदेश!*

6
0

*अपुऱ्या पावसाने पिकांचे नुकसान -* *बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळणार; मंत्री बावनकुळेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांचे सर्वेक्षणाचे आदेश!*

मुंबई / छत्रपती संभाजीनगर | १०-१२ सप्टेंबर

राज्यात अपुऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! बाधित शेतकऱ्यांना सरकारी नियमांनुसार नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची मोठी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्र कमतरता आहे. सरासरी फक्त ५७.७८% पाऊस झाला असून २० दिवसांचा मोठा खंड पडला आहे.

*मंत्री बावनकुळे म्हणाले -*
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना अपुऱ्या पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या भागांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. महसूल, कृषी आणि ग्रामीण विकास विभाग संयुक्तपणे हे सर्वेक्षण करतील आणि ते पूर्ण झाल्यावर नियमांनुसार शेतकऱ्यांना आवश्यक नुकसान भरपाई दिली जाईल,” असे बावनकुळे यांनी नागपूरमध्ये सांगितले.

यापूर्वीच त्यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी पीक परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. आता भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here