Home मुंबई *बाप्पा येतोय…कोकणात! पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्याकडून गणेशोत्सवासाठी ५०० मोफत...

*बाप्पा येतोय…कोकणात! पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्याकडून गणेशोत्सवासाठी ५०० मोफत एस.टी. बस!*

6
0

* *बाप्पा येतोय…कोकणात! पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत यांच्याकडून गणेशोत्सवासाठी ५०० मोफत एस.टी. बस!*

मुंबई | १२ सप्टेंबर २०२६

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी खुशखबर! पालकमंत्री ना. उदयजी सामंत आणि आमदार किरण भैया सामंत यांच्या माध्यमातून मुंबईतून रत्नागिरी, लांजा, राजापूर, साखरपा येथे तब्बल ५०० मोफत एस.टी. बस सोडण्यात येणार आहेत.

हजारो कोकणवासीय मुंबईतून कोकणाकडे या बसेस मधून रवाना होणार आहेत. कोकणवासीयांच्या सुखरूप प्रवासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध असल्याचे सामंत बंधूंनी सांगितले.

“आपला कोकण, आपली माणसं…” या भावनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. मुंबईतील गर्दी लक्षात घेऊन चाकरमान्यांना मोफत आणि सुरक्षित प्रवास मिळावा हा यामागचा उद्देश आहे.

बाप्पा येतोय…कोकणात! या घोषवाक्यासह या बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here