शिर्डी दि. ३० प्रतिनिधी
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिना निमित्ताने दरवर्षी देण्यात येणा-या साहित्य जीवन गौरव आणि कलागौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, या वर्षीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यीक डॉ.प्रेमानंद गज्वी, राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार डॉ.समीर चव्हाण, राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार प्रफुल्ल शिलेदार, अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार डॉ.श्रीनिवास हेमाडे आणि जिल्हा विशेष साहीत्य पुरस्कार बाळासाहेब लबडे , डॉ.विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार प्राजक्त देशमुख आणि राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार तमाशा कलावंत हसन शेख पाटेवाडीकर यांना देण्यात येणार असल्याची माहीती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी दिली.


















