Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *सोशल सर्विस लीग रात्र शाळेचे शिक्षक विजय सावंत व राहुल जगताप लायन्स...

*सोशल सर्विस लीग रात्र शाळेचे शिक्षक विजय सावंत व राहुल जगताप लायन्स क्लब पुरस्काराने सन्मानित*

103
0

*सोशल सर्विस लीग रात्र शाळेचे शिक्षक विजय सावंत व राहुल जगताप लायन्स क्लब पुरस्काराने सन्मानित*

पाच सप्टेंबर च्या शिक्षक दिनानिमित्ताने, अभ्युदय येथील शिवाजी विद्यालयात नुकताच लायन्स क्लबने मुंबईतील उपक्रमशील व गुणवंत शिक्षकांचा सत्कार आयोजित केला होता.यावेळी मुंबईचे माजी शेरीफ श्री. जगन्नाथराव हेगडे यांच्या हस्ते विजय सावंत व राहुल जगताप व ईतर अनेक शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.

“हा माझा एकट्याचा सन्मान नसून ज्या संस्थेने आपल्या शाळेत मला शिकविण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या सोशल सर्विस लीग संस्थेचा व पर्यायाने माझ्या विद्यार्थ्यांचाही,सहकारी शिक्षकांचाही सन्मान आहे असे मी समजतो.कारण रात्र शाळेत येणारे सगळे विद्यार्थी हे वयाने खूप मोठे असतात दिवसाला कुठेतरी काम करत असताना आपल्या अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाचा ध्यास घेऊन मोठे होण्याची स्वप्न उराशी बाळगून ते रात्र शाळेत प्रवेश घेतात व यशस्वी होतात ” लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट च्या, लायन्स क्लब ऑफ़ मीडटाऊन तर्फे शिक्षकांसाठीचा लायन्स क्लब शिक्षक पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. यावेळी विजय परदेशी सर पदाधिकारी,विद्यार्थी,पालक,मुख्याध्यापक संस्था प्रमुख व शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर मोठया प्रमाणात उपस्थित होते.

विजय सावंत सिंधुदुर्ग जिल्यातील दोडामार्ग तालुक्यातिल कुंब्रल गावचे सुपुत्र असून ते वेवसायाने शिक्षक आहेत.S.C.R.T,पुणे M.E.P.A. औरंगाबाद, R.A.A.औरंगाबाद नाशिक इत्यादी ठिकाणी राज्य स्तरावर त्यांनी इंग्रजी व इतर विषयासाठी काम केले आहे. तसेच पाठ्य पुस्तकातील क्युआर कोड तयार करण्यासाठी मदत केल्याबद्दल शिक्षण मंत्र्यानी प्रशस्ती पत्रक देऊन त्याना सन्मानीत केले आहे.तसेच त्यांचे ” *प्रकाश किरणाच्या शोधात ” व ” *जगण्याचे आर्त* ” असे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून नवा कथासंग्रह ” *धाकावयले कावळे* हा प्रकाशनाच्या मार्गांवर आहे.यापूर्वी त्यांना एकता कल्चरल एकादमी मुंबई यांचा “*महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार*” व अहिल्या शिक्षण संस्थेचा ” यांचा *गुणवंत शिक्षक पुरस्कार*” तर लक्ष्मी शिक्षण संस्थेतर्फे “*साने गुरुजी* पुरस्कार प्राप्त झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here