Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *भविष्य निर्वाह निधी फसवणूक गुन्ह्यातून कामगार नेते विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्यासह १०...

*भविष्य निर्वाह निधी फसवणूक गुन्ह्यातून कामगार नेते विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्यासह १० जणांची निर्दोष मुक्तता!*

32
0

*भविष्य निर्वाह निधी फसवणूक गुन्ह्यातून कामगार नेते विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्यासह १० जणांची निर्दोष मुक्तता!*

*सोलापूर -* कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन (EPFO) कार्यालयाने दाखल केलेल्या फसवणूक गुन्ह्यातून कामगार नेते विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्यासह १० जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

*काय होता आरोप?*
सन २०१८ मध्ये सदर बाजार पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ४२०, ४६५, ३४ अन्वये दोन गुन्हे दाखल झाले होते. आरोप असा होता की, पेन्शन मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये बनावट आणि बोगस शाळा दाखला सादर करून EPFO कार्यालयाची संगनमताने फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते.

*न्यायालयाचा निकाल:*
मे. मुख्य न्यायदंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. तपासण्यात आलेल्या साक्षीदारांची साक्ष विश्वासार्ह न वाटल्याने न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश दिला.

*निर्दोष मुक्त झालेले:*

१) विष्णू कारमपुरी (महाराज)
२) श्रीनिवास जोशी
३) दत्तात्रय कुलकर्णी
४) विजयलक्ष्मी एनगंटी
५) लक्ष्मी मोतीवाले
६) सुंदराबाई पंतुवाले
७) जमुनाबाई आंबेवाले
८) पार्वती कजाकवाले
९) मिनाबाई लंगडेवाले
१०) अंबुबाई द्यावरकोंडा

_(सर्व महिला विडी कामगार)_

*न्यायालयीन कामकाज:*
सरकारी पक्षाकडून – श्रीमती जे. एस. वाघमारे
आरोपींकडून – अॅड. विजय मराठे, अॅड. मंगेश श्रीखंडे, अॅड. मुनिनाथ कारमपुरी, अॅड. अनिता कळके, अॅड. पद्मिनी गंगशेट्टी, अॅड. वाघमारे यांनी काम पाहिले.

*- संपादक: शीतल हरीश करदेकर | MAI MEDIA 24 | सोलापूर*

#SolapurBreaking #EPFO #VishnuKarampuriMaharaj #NirdoshMuktata #MAIMedia24 #BidiKamgar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here