Home पुणे *१३ वर्षांचा वनवास! २ कोटींचा प्रकल्प २९ कोटींवर, तरीही बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृहाचे...

*१३ वर्षांचा वनवास! २ कोटींचा प्रकल्प २९ कोटींवर, तरीही बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृहाचे कुलूप बंदच*

8
0

*MAI MEDIA 24 | एक्सक्लुझिव्ह | पुणे – कोथरूड*

*१३ वर्षांचा वनवास! २ कोटींचा प्रकल्प २९ कोटींवर, तरीही बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृहाचे कुलूप बंदच*

*पुणे,

कोथरूड, पुणे येथील स्व. बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह आणि कलादालनाचा प्रकल्प गेल्या १३ वर्षांपासून रखडला आहे. २०१४-१५ मध्ये जाहीर झालेल्या ३८५ आसनक्षमतेच्या या प्रकल्पाचे बजेट सुरुवातीला २ ते ७ कोटी होते, जे आता थेट २० ते २९ कोटींवर पोहोचले आहे.

धक्कादायक म्हणजे – जून २०२६ मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीने पुन्हा एकदा भित्तीचित्रे (Murals) व अंतर्गत सजावटीसाठी *६८.९५ लाख* रुपयांच्या अतिरिक्त खर्चाला मंजुरी दिली, पण *उद्घाटनाची तारीख मात्र आजही गुलदस्त्यात आहे.*

यामुळे स्थानिक कलाकार, रंगकर्मी व नाट्यरसिकांमध्ये तीव्र संताप आहे. या वाढीव खर्चाचा हिशोब कोण देणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभाग आणि समस्त रंगकर्मी पुणेच्या वतीने *२९ ऑगस्ट २०२६ रोजी बेमुदत उपोषणाची नोटीस* पुणे महापालिका आयुक्त आणि कोथरूड पोलिसांना देण्यात आली आहे.

*

कोथरूडमधील बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह १२-१३ वर्षांपासून रखडले, ६९ लाखांचा नवा खर्च मंजूर – तरीही उद्घाटन गुलदस्त्यात! २९ ऑगस्टला बेमुदत उपोषण!

#Kothrud #PunePMC #BalNatyaGruha #BalasahebThackeray #MAIMEDIA24 #PuneNews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here