*मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (MAI)*
*MAI MEDIA 24 – मराठी बातम्या | 24 तास*
*अधिकृत निवेदन – दि. 27 ऑगस्ट 2026*
*विषय: COEP प्रकरणात एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर दाखल झालेल्या तक्रारीचा तीव्र निषेध व त्यांना तक्रारीतून वगळण्याची मागणी.*
COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, पुणे येथील आंदोलनाचे वार्तांकन करताना एबीपी माझाचे पत्रकार श्री. मंदार गोंजारी यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची बाब अत्यंत गंभीर व निषेधार्ह आहे.
कॉलेज प्रशासनाने “परवानगीशिवाय कॅम्पसमध्ये प्रवेश करून इंटरव्यू घेतले” या कारणास्तव तक्रार दिल्याचे समजते. मात्र, एका पत्रकाराने कॅमेरा आणि ओळखपत्रासह उघडपणे, जनहिताच्या विषयावर (फी वाढ) बातमीदारी करणे हे त्याचे संवैधानिक कर्तव्य आहे. त्याला बेकायदेशीर जमावाचा भाग समजून BNS सारख्या गंभीर कलमांतर्गत तक्रारीत समाविष्ट करणे हे प्रेस स्वातंत्र्यावर घाला आहे.
*मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाची स्पष्ट भूमिका:*
*“पत्रकारावर तक्रार दाखल करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. बातमीदारी करणं हे पत्रकाराचं कर्तव्य आहे. एबीपी माझाचे पत्रकार मंदार गोंजारी यांना तक्रारीतून तत्काळ वगळणे आवश्यक आहे.”*
आम्ही पुणे पोलीस आयुक्त व पुणे पोलिसांना विनंती करतो की, या प्रकरणाची सखोल चौकशी करून, CCTV फुटेजच्या आधारे वस्तुस्थिती तपासून, पत्रकार श्री. मंदार गोंजारी यांचे नाव तक्रारीतून तात्काळ वगळण्यात यावे.
शैक्षणिक संस्थांनीही पत्रकारांना सहकार्य करून संवादातून प्रश्न सोडवावेत, गुन्हे दाखल करण्याची भूमिका टाळावी, असे आवाहन आम्ही करत आहोत.
*आपली विश्वासू,*
*शीतल हरीश करदेकर*
*संस्थापक अध्यक्ष*
*मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया (MAI)*
*संपर्क: MAI MEDIA 24 | http://www.maimedia24.com*
*प्रत:*
1. मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर
2. मा. पोलीस अधीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे
3. मुंबई प्रेस क्लब / पुणे श्रमिक पत्रकार संघ
#PressRelease #MAI #OfficialStatement
























