* *”मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ” – संदीप देशपांडेंची जोरदार टीका*
* ‘मराठी सण गुजरात्यांच्या हातात जात आहेत, याला लालबागचा राजा मंडळ जबाबदार आहे,’ असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. ‘लालबागचा राजा’ मंडळाने गणेशोत्सव उद्योगपतींच्या हातात देणे दुर्दैवी आहे. मंडळाकडे कोट्यवधी देणग्या येतात, मग उद्योगपतींची मदत कशाला? अनंत अंबानी यांची सल्लागार नियुक्ती का? आता अंबानींपाठोपाठ अदानी आले, उद्या JSW आणि गोदरेजही येतील. गणेशोत्सव मंडळांना कॉर्पोरेट वॉरचे ठिकाण बनवायचे आहे का? गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या मातीतला आणि मराठी माणसाचा सण आहे.
*
























