‘कोल्हापूरचा राजा’ या नवसाला पावणाऱ्या बाप्पाचे तब्बल १५ वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेसह उत्साहात आणि दिमाखात आगमन झाले.
या आगमन सोहळ्याला उपस्थित राहून, बाप्पाची विधिवत पूजा व आरती केली. यावेळी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. आपल्या लाडक्या बाप्पाचा हा उत्सव असाच उत्साहात आणि चैतन्यात साजरा होवो, ही सदिच्छा व्यक्त केली.
यावेळी कोल्हापूरच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो युवक, युवती आणि नागरिकांची अभूतपूर्व उपस्थिती होती. संपूर्ण करवीर नगरी बाप्पाच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती.
#KolhapurchaRaja #UdaySamant #ShivSena #Ganeshotsav2026 #Kolhapur #BappaMorya #MarathiBhasha #FestivalVibes





















