Home मुंबई *कांदा दरघसरणीच्या पार्श्वभूमीवर पाशा पटेल समितीच्या शिफारशींबाबत डॉ. नीलम गोऱ्हेंची विधानपरिषदेत विचारणा*

*कांदा दरघसरणीच्या पार्श्वभूमीवर पाशा पटेल समितीच्या शिफारशींबाबत डॉ. नीलम गोऱ्हेंची विधानपरिषदेत विचारणा*

46
0

मुंबई.दि.९: राज्यातील कांदा दरघसरणीच्या प्रश्नावर विधानपरिषदेत शिवसेना नेत्या व विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाशा पटेल समितीच्या शिफारशींबाबत सरकारकडे माहिती मागितली. मोठे प्रश्न निर्माण झाल्यानंतर विविध समित्या नेमल्या जातात. मात्र, त्या समित्यांच्या शिफारशींपैकी कोणत्या स्वीकारल्या आहेत, याबाबत त्यांनी सरकारची भूमिका जाणून घेतली.

यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीबाबत केलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर जागतिक परिस्थितीचा राज्यातील उद्योगांवर, विशेषतः चाकणसारख्या औद्योगिक क्षेत्रांवर, काही परिणाम होण्याची शक्यता आहे का आणि त्यासाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी विचारणाही डॉ. गोऱ्हे यांनी केली.

यास उत्तर देताना मंत्री जयकुमार रावल यांनी पाशा पटेल समितीचा अहवाल १६ ऑगस्ट रोजी प्राप्त होणार असून त्यानुसार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे सांगितले. तसेच सध्या राज्यातील कृषी मालाला समाधानकारक भाव मिळत असून संभाव्य जागतिक घडामोडींचा त्यावर प्रतिकूल परिणाम होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील कांदा दरघसरणीबाबत विधानपरिषद सदस्य विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हे मुद्दे मांडले.
——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here