*नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे- महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन*
भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात उद्या, रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे. या दरम्यान, मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. तसेच, उद्या दुपारी ३.२२ वाजता समुद्राला ४.१९ मीटर उंचीची भरती आहे.
या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
***


















