Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *६ जुलै रोजी श्रीराम मंदिरात रामरक्षा आंदोलनांतर्गत महाआरतीचे आयोजन*

*६ जुलै रोजी श्रीराम मंदिरात रामरक्षा आंदोलनांतर्गत महाआरतीचे आयोजन*

34
0

*सो.दि.४/७/२६ :- सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोमवारी ६ जुलै रोजी पूर्व विभाग दाजी पेठ येथील श्रीराम मंदिरात सकाळी १०.३० वाजता रामरक्षा आंदोलनांतर्गत प्रभू श्रीरामांची महाआरती आयोजित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण , जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर व महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी दिली असल्याचे कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी महाराज यांनी प्रसिद्धीस दिली आहे*.
*अखंड हिंदुस्तानचे श्रद्धास्थान असलेल्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या आयोध्येतील येथील मंदिरात झालेल्या चोरीची सखोल चौकशी करून संबंधितावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख मा. श्री उद्धव ठाकरे साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन जाहीर केले आहे सदर आंदोलन ५ जुलै २०२६ रोजी मुंबई येथील हनुमान मंदिर दादर या ठिकाणी मा.श्री. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दुपारी ४ , वाजता करण्यात येणार आहे*.
*पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुषमाताई अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दाजी पेठ श्रीराम मंदिर येथे श्रीराम रक्षा आणि महाआरती ६ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे*.
*तरी सोलापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवसेना प्रणित महिला आघाडी , विद्यार्थी सेना , कामगार सेना , रिक्षा सेना , शिव आरोग्य सेना , युवासेना , युवती सेना , शिक्षक सेना , व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रणित सर्व सलग्न संघटना पदाधिकारी शिवसैनिक व श्रीराम भक्त बंधूू भगिनींनी श्रीरामांच्या महाआरती कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण , जिल्हाप्रमुख शरणराज केंगनाळकर व महानगर प्रमुख महेश धाराशिवकर यांनी केले आहे*.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here