Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा खिडकी* अभिवाचनाचा विशेष प्रयोग *श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्तनिधीच्या* सहयोगाने !

खिडकी* अभिवाचनाचा विशेष प्रयोग *श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्तनिधीच्या* सहयोगाने !

41
0

गुरुवार दि. ३० जुलै
२०२६ रोजी दुपारी ४.०० वा. शिवाजी मंदिर, दादर येथेविनामूल्य प्रयोग

प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून आकारास आलेल्या पुस्तकाच्या अभिवाचनाचा विशेष प्रयोग दादर मधे होणार आहे.

खिडकीमध्ये कबरेंच्या जीवन प्रवासामध्ये आलेल्या अनुभवांचे लेखन स्वरूपात पुस्तकात शब्दबद्ध केलेले आहेत. आणि यातील काही निवडक अनुभवांचे कथन या प्रयोगाद्वारे आपणासमोर सादर करण्यात येणार आहे.

आत्तापर्यंत या अभिवाचनाचे ५५ प्रयोग सादर झाले आहेत आणि त्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळला आहे
आणि म्हणूनच या रसिकमान्य
*खिडकी* या अभिवाचनाचा आगामी प्रयोग *श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्तनिधीच्या* सहयोगाने
गुरुवार, दिनांक ३० जुलै
२०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता शिवाजी मंदिर, दादर
येथे सादर होणार आहे. हा प्रयोग सर्वांसाठी खुला व विनामुल्य आहे.

तरी सर्व रसिकांना विनंती की या प्रयोगाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन हा अनोख्या प्रयोगास भरभरून उपस्थितीतदाद द्यावी

विनामुल्य प्रवेशिकेसाठी
*राजेंद्र पै* 9820329009 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here