Home मुंबई *राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत...

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न*

34
0

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांचं ऑपेरेशन कधीही होणार नाही,खासदार निलेश लंके*

मुंबई दि. 26 जून

पक्ष पुन्हा एकदा नवीन जोमात उभा करण्याकरिता पक्ष संघटनेत लवकरच बदल करण्यात येणार असून त्यानंतर राज्यभर दौरा केला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना दिली आहे.

 

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली असून जिल्हास्तरावर काही बदल करण्यात येणार आहेत. नव्या जोमाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निर्णय घेतले जातील. त्यानंतर महाराष्ट्र दौऱ्याचे नियोजन करण्यात येईल,असे शशिकांत शिंदे म्हणाले.

शशिकांत शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या बैठकीत सर्व घटक पक्षांनी एकत्रित आंदोलन आणि संयुक्त दौरे करावेत, अशी सूचना आपण केल्याचे त्यांनी सांगितले. केवळ निवडणुकीपुरते नव्हे, तर सातत्याने एकत्रितपणे जनतेसमोर जाणे गरजेचे आहे,असेही शशिकांत शिंदे यांनी बोलताना सांगितले आहे.

संजय दिना पाटील यांच्या पत्रकारांवरील केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, सत्तेची धुंदी चढल्यानंतर काही जण कोणालाही न जुमानणारी भाषा वापरतात. पत्रकारांनाही दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. संजय राऊत बॉम्ब किंवा मारून टाकण्याची भाषा करत नाहीत. मात्र सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांकडूनही अशा प्रकारची वक्तव्ये होत आहेत, असे शशिकांत शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनावर बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, हे आंदोलन शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी होते. मंत्री गिरीश महाजन यांनी समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्यावर दबाव आल्यामुळे बैठक झाली नसावी, असेही शशिकांत शिंदे म्हणाले.

 

शशिकांत शिंदे म्हणाले की,राम मंदिराच्या नावावर राजकारण होत असल्याचा आरोप करत त्यांनी मंदिरासाठी जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या देणगीचा हिशोब सार्वजनिक करावा,अशी मागणी यावेळी शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

 

पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, सरकार पक्ष फोडणे आणि आमदार-खासदार फोडण्यात व्यस्त आहे. पाण्याचा गंभीर प्रश्न असताना शहरीकरणाला दिलेल्या परवानग्यांमुळे भविष्यात संकट अधिक वाढेल, असेही शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.

*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांचं ऑपेरेशन कधीही होणार नाही*खासदार निलेश लंके*

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्ववात आम्ही कामं करतो.आमचे चालक आदरणीय शरद पवार साहेब आहेत.ते आम्हाला सुरक्षित ठेवतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांचं ऑपेरेशन कधीही होणार नाही, असे खासदार निलेश लंके यांनी बोलताना सांगितले आहे.

खासदार निलेश लंके बोलताना म्हणाले की, खासदारांच्या चुका ज्या घडल्या त्यामुळे ते जनते समोर येत नाहीत.आम्ही कायम बोलतो,आदरणीय पवार साहेबांबरोबर आम्ही कायम असणार आहोत, असेही खासदार निलेश लंके म्हणाले.

खासदार निलेश लंके म्हणाले की,संसदेत कामकाज करत असताना,आम्ही सगळे एकत्र असतो, विकासकामांसाठी कोण सत्तेत आणि विरोधात आहे त्याचा विचार केला जातो पण विकासनिधी मिळत नसेल तरी,मी काम करणारा कार्यकर्ता आहे, निधी खर्च करण्यापेक्षा विकासकामे प्रत्यक्ष पूर्ण करण्यावर माझा भर असतो, असेही खासदार निलेश लंके यांनी बोलताना स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here