Home मुंबई *अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प*

*अहिल्यानगरमध्ये दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प*

37
0

*• शेती महामंडळाची साडेचार हजार एकर जमीन देण्यास महसूल विभागाची मान्यता*

*• मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रोजगाराभिमुख निर्णय*

मुंबई, दि. २३ : तरुणांच्या हाताला काम आणि औद्योगिक विकासासाठी महसूल विभागाने आज रोजगाराभिमुख क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील हरेगाव मळा येथील ४२०० एकर जागा दारुगोळा, स्फोटके, संरक्षण साहित्य, सौरऊर्जा प्रकल्प या तीन महत्वपूर्ण उद्योगांसाठी मंजूर केली असून यामुळे या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.

दारुगोळा व स्फोटके संशोधन आणि विकास सुविधा निर्माण करण्यासाठी डीआरडीओला ( संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ) १५०० एकर, सौरपार्क व पवनऊर्जा प्रकल्पासाठी महाऊर्जाला १२०० एकर तसेच संरक्षण साहित्य निर्मिती प्रकल्पासाठी निबे ऑर्डन्स अँण्ड मेरी टाईम फँक्टीरीज लिमिटेडला १५०० एकर अशी ४२०० एकर जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. बैठकीला शिक्षणमंत्री दादा भुसे आणि पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांची प्रमुख उपस्थित होत्या.

*• ४९ वर्षांच्या करारावर देणार जमीन*
या संस्थांना ही जमीन ४९ वर्षांच्या भाडेकरारावर (लीजवर) देण्यात येणार आहे. यासाठी प्रति एकर ५० हजार रुपये वार्षिक भाडे निश्चित करण्यात आले असून, तीन वर्षांचे भाडे एकाच वेळी भरावे लागणार आहे.

*• शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण*
या संस्थांना जमीन दिल्यानंतर शेती महामंडळाकडे शिल्लक राहणारी २,३०० एकर आणि अन्य १,६०० एकर अशी एकूण ३,९०० एकर अकारी पड जमीन परिसरातील शेतकऱ्यांना वाटप करण्याचा निर्णयही घेतला आहे. या निर्णयाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या अंतिम मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर वाटपाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे उपसमितीने स्पष्ट केले..
—-

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here