दादर व गिरगाव येथील बेस्टची वीज बिल भरणा केंद्रे पुन्हा सुरू
ग्राहकांच्या सोयीसाठी दादर (पश्चिम) येथील अमर हिंद मंडळ, गोखले रोड तसेच गिरगाव येथील झावबावाडी, राम मंदिराशेजारील बेस्टची वीज बिल भरणा केंद्रे आज पुन्हा सुरू करण्यात आली.
मा. बेस्ट समिती अध्यक्ष यांच्या हस्ते सकाळी ११.०० वाजता या वीज बिल भरणा केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संबंधित विभागप्रमुख, शिवसेना उपनेते श्री. सदा सरवणकर, श्री सिद्धीविनायक मंदिराचे विश्वस्त तसेच शिवसेना नेत्या श्रीमती मीनाताई कांबळी यांच्यासह सर्व उपनेते, विभागप्रमुख तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
या केंद्रांच्या पुनःप्रारंभामुळे दादर, गिरगाव व परिसरातील वीज ग्राहकांना वीज बिल भरण्याची सुविधा अधिक सुलभ व जवळच्या ठिकाणी उपलब्ध होणार असून, ग्राहकांचा वेळ व प्रवासाचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.
बेस्ट उपक्रम ग्राहकाभिमुख सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, भविष्यातही अशा सुविधा वाढविण्यास कटिबद्ध आहे.


















