Home मुंबई *हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२५ चा भव्य गौरव सोहळा !*

*हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२५ चा भव्य गौरव सोहळा !*

36
0

*मुंबईतील नामांकित आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव…*

मुंबई : मुंबई आणि परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणपूरक तसेच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या कायार्चा गौरव करण्यासाठी ‘हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२५’ या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘टेकेरियस डेव्हलपमेंट’ प्रस्तुत आणि ‘बँड्स मेकर’ आयोजित या उपक्रमाला ‘मुंबईचा गणेशोत्सव’ आणि ‘माई मीडिया २४’ मुन चॅरिटेबल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले असून एन जी ओ पार्टनर कवच चॅरिटेबल ट्रस्ट महत्वाची भूमिका निभावणार आहेत.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृती- परंपरेचा आणि जनशक्तीचा महत्त्वाचा उत्सव मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून प्रेरणा घेऊन लोकमान्य
व्यापक स्वरूप दिले. समाजप्रबोधन, एकता आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम म्हणून गणेशोत्सवाची ओळख निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला ‘महाराष्ट्र राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करून या परंपरेचा गौरव केला. त्याच ऐतिहासिक निर्णयाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाची जागतिक स्तरावर ओळख अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने ‘हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२५’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
दि १४ जून२०२६ रोजी सायंकाळी ४वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर,मंत्रालया समोर आयोजित
या सोहळ्यात सामाजिक बांधिलकी जपणारी, पर्यावरणपुरक उपक्रम
राबविणारी, कलात्मक देखावे सादर करणारी आणि वर्षभर विविध सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असलेल्या नामांकित गणेशोत्सव मंडळांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मुंबई महापौर रितू तावडे, अभिनेते विजय पाटकर प्रमुख पाहुणे या प्रसंगी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गणेशोत्सव मंडळांचे समाजासाठीचे योगदान आणि त्यांची निष्ठा यांचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असून, गणेशोत्सवाला जागतिक मंचावर अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न या प्रोत्साहनपर कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क
: ९१३६१३६१५२ ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here