माईमीडिया24′ ब्रेकिंग
`BMC चा ‘बळीचा बकरा’ माहीम! कापडबाजार ते शिवाजीपार्कचा कचरा एकाच ठिकाणी, वरिष्ठ नागरिक 2023 पासून गॅस चेंबरमध्ये`
`आजूबाजूला कचरा गोळा करण्याची सोयच नाही, शीतलादेवी रोड बनला ‘अर्ध्या दादरचा डम्पिंग यार्ड’ – रहिवाशांचा आक्रोश`
*शीतल करदेकर / माईमीडिया24, मुंबई*
महापौर रितू तावडे ‘स्वच्छ मुंबई’ च्या वल्गना करत असताना, BMC ने माहीम पश्चिम येथील शीतलादेवी टेम्पल रोडला *’अर्ध्या दादर-माहीमचा कचरा डेपो’* बनवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
*स्थानिक रहिवासी प्रिया वसईकर यांनी ‘माईमीडिया24’ ला सांगितले:*
*”ताई, *इथे कापडबाजार पासून शिवाजीपार्कच्या* *परिसरातील कचरा आणून मोठ्या गाडीत जमा केला जातो.* कारण *आजूबाजूच्या परिसरात कुठेच कचरा गोळा करण्याची सोय BMC ने केली नाही.* त्यामुळे छोट्या गाड्या दिवसभर कचरा आणून इथे ओततात. दुपारी २-३ मोठ्या गाड्या उभ्या राहतात. भयंकर दुर्गंधी. आम्ही वरिष्ठ नागरिक सकाळी ११ ते रात्री खिडक्या-दारे बंद करून बसतो.”*
*म्हणजे BMC चा फॉर्म्युला स्पष्ट आहे:* कापडबाजार, शिवाजीपार्क, रनडे रोड स्वच्छ ठेवायचा आणि *शीतलादेवी रोडवरील नागरिकांच्या घरासमोर सगळ्या परिसराचा कचरा साठवायचा.*
*VIDEO पुरावा:* 👉 https://x.com/i/status/2062144308602618232
*२०२३ पासून पाठपुरावा व्यर्थ:* नगरसेवक, G/N वॉर्ड, शीतल गंभीर यांना भेटूनही तात्पुरती कारवाई. *कारण मूळ प्रश्न – ‘इतर ठिकाणी कचरा संकलन केंद्र नाही’ – तो BMC ने सोडवलाच नाही.*
*●अडीचकी’ महापौरांचा इतिहास:* हरेश्वर पाटील यांनी दहिसरमध्ये विकेंद्रित कचरा व्यवस्था केली. *आज महापौर रितू तावडे यांच्या काळात एका प्रभागावर संपूर्ण परिसराचा भार टाकलाय.*
*’माई मीडिया 24′ चे महापौर @TawdeRitu यांना ६ सवाल:*
१. कापडबाजार ते शिवाजीपार्कचा कचरा माहीमकरांच्या घरासमोर का?
२. आजूबाजूच्या वॉर्डात कचरा संकलनाची सोय का नाही?
३. एका निवासी रस्त्याला ‘झोनल डम्पिंग यार्ड’ बनवण्याचा नियम कोणता?
४. १०० दिवसांच्या टार्गेटमध्ये *’विकेंद्रित कचरा व्यवस्था’* आहे का?
५. वरिष्ठ नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार?
६. वल्गना सोडून आधी हा अन्याय कधी थांबवणार?
*’माई मीडिया 24′ ची डेडलाईन:* @mybmc @mybmcWardGN यांनी *48 तासांत*
अ) शीतलादेवी रोडवरील ‘ट्रान्सफर पॉइंट’ बंद करावा.
ब) कापडबाजार, शिवाजीपार्क परिसरात स्वतंत्र कचरा संकलन व्यवस्था करावी.
अन्यथा ‘माईमीडिया24’ वरिष्ठ नागरिकांसह महापौर कार्यालयावर धडक देणार.
—
—
















