*शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेच्या माध्यमातून निवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय.*
*आमदार व शिवसेना उपनेते, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सचि आहीर, उपनेते व बेस्ट कामगार सेनेचे प्रमुख सल्लागार गौरीशंकर खोत यांच्या सहकार्याने शिवसेना उपनेते, बेस्ट कामगार सेनेचे सरचिटणीस व बेस्ट समिती सदस्य डॉ. नितीन नांदगावकर यांच्या ठरावाच्या सूचनेनुसार,*
*बेस्टमध्ये बंद करण्यात आलेला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा मोफत बसपास पुन्हा सुरू करण्याच्या प्रस्तावाला बेस्ट समितीने एकमताने मंजुरी दिली आहे.*
*पुढील काही दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करून, सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना बेस्टचा लोगो, कर्मचारी वर्गाचा फोटो,आणि त्यांचे सेवानिवृत्तीचे पद नमूद करून मोफत बसपास देण्यात येणार आहे.*
***


















