Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर *प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाही तर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा आहे*

*प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाही तर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा आहे*

30
0

*नीटचे पेपर फुटल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांची प्रतिक्रिया*

*“महत्वाच्या परीक्षांचे पेपर वारंवार फुटतातच कसे? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई झाली?”*

*यंत्रणा चुक करते, काही पैशांसाठी लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा जुगार करते त्यांना मात्र बक्षिसे मिळतात पण विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय मिळतं? तर फक्त त्रास*

सांगली:- महत्वाच्या परीक्षांचे पेपर वारंवार फुटतातच कसे? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई झाली? असा प्रश्न उपस्थित करत प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाही तर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी नीटचे पेपर फुटल्याप्रकरणी दिली आहे.

जयंतराव पाटील म्हणाले की, भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी दहावीचा निकाल लागताच #NEET च्या परीक्षेच्या तयारीला लागतात. सलग दोन‌ वर्ष मेहनत करून बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थी लगेच ही #NEET ची परीक्षा देतात. पण यंदाचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

यंदाच्या वर्षी म्हणजेच ३ मे २०२६ रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता, ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा या परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. यात विद्यार्थ्यांना मानसिक त्रास तर आहेच पण त्यासोबतच पालकांनाही त्रास सहन करावा लागणार आहे. प्रश्न फक्त पेपर फुटीचा नाही तर शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाचा आहे.

२०२४ साली देखील अशाच पद्धतीने पेपर फुटला होता. महत्वाच्या परीक्षांचे पेपर वारंवार फुटतातच कसे? विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांवर आतापर्यंत काय कारवाई झाली? NTAचे DG असणाऱ्या IAS सुबोध कुमार सिंह यांना तात्पुरते पदावरून काढले गेले. पण नंतर लगेच त्यांना स्टील मंत्रालयात रुजू करण्यात आले आणि आता ते छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहेत. म्हणजे ही जी यंत्रणा चुक करते, काही पैशांसाठी लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा जुगार करते त्यांना मात्र बक्षिसे मिळतात पण विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय मिळतं? तर फक्त त्रास असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here