*-देशहिताला प्राधान्य देत मंत्री ॲड.आशिष शेलार यांचा कान्स दौरा रद्द*
मुंबई,
देश सध्या कठीण परिस्थितीतून जात असताना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे सांस्कृतिक कार्य तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी यंदाच्या फ्रॉन्स येथील कान्स फिल्म फेस्टिव्हलला न जाण्याचा निर्णय जाहीर केला.
मंत्री ॲङशेलार यांनी सांगितले की, कठीण काळात देशहिताला सर्वोच्च मान देत विभागीय खर्चांमध्ये संयम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अधिकाधिक बैठका व्हर्च्युअल माध्यमातून घेण्यात येणार असून संसाधनांचा मर्यादित वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान, कान्स चित्रपट महोत्सवात सहभागी होणाऱ्या मराठी चित्रपट तसेच त्यासंदर्भातील आवश्यक समन्वय आणि सहकार्यासाठी संबंधित यंत्रणा नियोजित पद्धतीने कार्यरत राहतील, तसेच मराठी सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी जिथे आवश्यकता असेल तिथे आँनलाईन सहभागी होईन, असेही मंत्री ॲड.शेलार यांनी सांगितले.
000


















