Home Trending Now *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विचारपूस*

*पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विचारपूस*

37
0

*हेलिकॉप्टर घटनेबद्दल आस्थेने चौकशी करून काळजी घेण्याचा दिला सल्ला*

*कोलकता येथील शपथविधी दरम्यान मोदी आणि शिंदे यांच्यात झालेल्या चर्चेची राजकीय वर्तुळात उत्सुकता*

कलकत्ता (पश्चिम बंगाल) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ जाऊन त्यांची आस्थेने चौकशी केली. गुरुवारी खराब हवामानामुळे उपमुख्यमंत्री शिंदे यांचे हेलिकॉप्टर भरकटले होते. त्यानंतर या हेलिकॉप्टरला जुहू येथील पवनहंस येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. पंतप्रधान मोदी यांनी आज शिंदे यांच्याकडे याबाबत विचारपूस केली. तसेच यापुढे विमानप्रवास करताना काळजी घ्या असा वडिलकीचा सल्लाही दिला.

पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री शुवेंदु अधिकारी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे आज पश्चिम बंगालमध्ये गेले होते. या सोहळ्या दरम्यान पंतप्रधान मोदी हे सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अभिवादन करत पुढे सरकत असताना अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याजवळ थांबत त्यांच्याशी चर्चा करताना दिसले. यावेळी त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असावी याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र मोदी यांनी शिंदे यांच्या बाबतीत हेलिकॉप्टरमधील प्रवासादरम्यान झालेल्या या घटनेबाबतची बातमी कानावर आली असल्याचे सांगत शिंदे यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच यापुढे विमानप्रवास करताना अधिक काळजी घेण्याचा सल्लाही दिला.

मोदी आणि शिंदे यांच्या चर्चेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाल्याने यावेळी त्यांच्यात नक्की काय चर्चा झाली असावी याची उत्सुकता सर्वांनाच होती. मात्र पंतप्रधान मोदी यांनी शिंदे यांच्याबद्दल घडलेल्या या घटनेबाबत चौकशी करून आपल्या सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत किती दक्ष आहोत हेच या छोट्याशा प्रसंगाद्वारे दाखवून दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here