Home पुणे ‘पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघा’ च्या संकेतस्थळाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते...

‘पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघा’ च्या संकेतस्थळाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते अनावरण

73
0

​भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धगधगते अग्निकुंड मानले जाणारे क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, शहीद भगतसिंग आणि शहीद सुखदेव यांच्या बलिदान दिनानिमित्त , पुणे जिल्हा रहिवासी सेवा संघाच्या वतीने मंत्रालय येथील हुतात्मा राजगुरू चौक येथे विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
​या ऐतिहासिक सोहळ्याला प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
​याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करताना डिजिटल माध्यमातून संस्थेचे कार्य अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला. क्रांतीवीरांच्या स्मृतींना उजाळा देत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
​संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब ठाकूर आणि संचालक भरत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाला संस्थेचे सर्व संचालक, पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here