Home Uncategorized अ भा मराठी नाट्यपरिषद, बोरिवली शाखेत ‘मराठी भाषा गौरव दिवस’

अ भा मराठी नाट्यपरिषद, बोरिवली शाखेत ‘मराठी भाषा गौरव दिवस’

26
0

अ भा मराठी नाट्यपरिषद, बोरिवली शाखेत ‘मराठी भाषा गौरव दिवस
मराठी बोली भाषेतील कथांचे अभिवाचन व कथाकथनाने संपन्न!

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, बोरिवली शाखेत मराठी भाषा गौरव दिवस’ २८ फेब्रुवारी रोजी
‘मराठी भाषा गौरव दिवस’ ‘बोली भाषेतील कथांचे कथाकथन आणि अभिवाचन’ करून साजरा करण्यात आला.
बोरिवली शाखेचे, प्रमुख कार्यवाह दामोदर टेंबुलकर ह्यांनी सर्व रसिक प्रेक्षकांचे स्वागत केले. त्यानंतर अध्यक्ष प्रभाकर (गोट्या) सावंत ह्यांनी, नटराज पूजन व कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला हार घालून भाषा दिनाचे महत्त्व उपस्थित प्रेक्षकांना सांगितले. याप्रसंगी , संस्कृत प्राचार्या आणि संवादक प्रज्ञा दर्भे ह्यांनी मराठी भाषा आणि बोलीभाषा ह्याबद्दल विशेष माहिती दिली. त्यानंतर नेत्रा वेदक- मालाडकर, चंद्रकांत मोरे ,मकरंद सावंत, हेमंत ओमकार वारकर आणि प्रज्ञा दर्भे ह्यांनी मराठी,मालवणी, व्हराडी ,खानदेशी खिवारी आणि संस्कृत भाषांमध्ये कथाकथन आणि अभिवाचन सादर केले. कार्यक्रमाला कार्यवाह राजेंद्र पिसाट,कार्यवाह प्रशांत जोशी , समिती सदस्य हेमंत बिडवे, माधुरी राजवाडे, चंद्रकांत मोरे, समीर तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. हेमंत बिडवे यांनी सर्व उपस्थितीत रसिक आणि सहभागींचे आभार मानले. कार्यक्रमाची संकल्पना प्रशांत जोशी यांची होती. या प्रसंगी रसिक प्रेक्षक श्रीकृष्ण कुलकर्णी यांनी शाखेच्या या नवीन उपक्रमाचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here