Home मुंबई सभापती राम शिंदे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देणार की,...

सभापती राम शिंदे उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देणार की, आदेश कायम ठेवणार?

25
0

उपसभापतींनी दिलेला आदेश सभागृहाच्या घटना, परंपरेनुसार! त्यांचा आदेश बदलणे अयोग्य असे अभ्यासकांचे मत!
सोमवारी विधानपरिषदेत सदस्य आमदार , मंत्री यानी साताऱ्यातील निवडणुकीदरम्यान घडलेली घटना व एकूणच वास्तव सांगितल्यावर पीठासीन अधिकारी असलेल्या उपसभापती डाॅ नीलम गोऱ्हेंनी कारवाई चे आदेश दिले.
मात्र निवडणुकीतला पुढचा भाग विधानपरिषदेत दिसला. सभापती उपसभापतीच्या आदेशाला स्थगिती देऊन शकत नाहीत कारण सभापतींच्या अनुपस्थितीत त्या खुर्चीवर जी व्यक्ती असते तिला तो अधिकार असतो ही सभागृहाची परंपरा व घटनेनुसार आहे. असे अभ्यासकांचे मत आहे.
मात्र तरीही या विषयावर मंत्री जयकुमार यांनी आक्षेप घेतला.
त्यामुळे चर्चा सुरु झाली.
सभापती राम शिंदे उपसभापती डाॅ नीलम गोऱ्हे यांनी दिलेल्या आदेशाला स्थगिती देणार की, आदेश कायम ठेवणार? याबाबत चर्चा सुरू आहेत.
सभापती राम शिंदे नीलम गोऱ्हेंचा निर्णय फिरवणार? साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनाच्या निर्णयावरुन वातावरण तापले.
सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीचे पडसाद विधिमंडळात उमटल्याचं पाहायला मिळालं. सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विधान परिषदेत भाजप आणि शिवसेनेत जुंपली. सातारा पोलीस अधीक्षकांना आणि सर्व पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, जिल्हा परिषद आवारातील सीसीटीव्ही फुटेज सादर करावं. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावं, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. पण, आता डाॅ नीलम गोऱ्हे यांनी दिलेले आदेश कायम राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. सभापती राम शिंदे निलम गोऱ्हे यांच्या आदेशाला स्थगिती देणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

साताऱ्यात वाद, विधिमंडळात पडसाद
भाजपच्या करारनाम्याचा शिवसेनेकडून हिशेब घेण्यात आला. भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’मुळे महायुतीतील शिंदेसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन सदस्य फुटल्याने भाजपची सत्ता आली. या घडामोडींचे विधिमंडळात आणि राजकीय वर्तुळात पडसाद उमटले आहेत. सातारा झेडपी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विधान परिषदेत भाजप शिवसेनेत चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. एसपीचं निलंबन करण्याचे आदेश उपसभापती निलम गोऱ्हेंनी सरकारला दिले आहेत. सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

निलम गोऱ्हेंचे काय काय आदेश?
सातारा पोलीस अधीक्षकांना निलंबित कराजिल्हा परिषद आवारातीली सीसीटीव्ही द्यावेविभागीय आयुक्तांनी यात स्वतः लक्ष घालावे

दरम्यान वस्तुस्थिती अहवाल न मागवता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश कसे दिले? असा प्रश्न मंत्री जयकुमार गोरेंनी केलाय. एसपींचं निलंबन तात्काळ स्थगित करण्याची मागणी जयकुमार गोरेंनी केली.
*भाजपच्या जयकुमार गोरेंचे आक्षेप काय?*
शंभुराज देसाई,मकरंद पाटील हे मंत्री जि.प.आवारात गेलेच कसे?देसाई,पाटील या मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश का मोडले? वस्तुस्थिती समजून न घेता चर्चेवर आधारीत निलंबनाचे आदेश कसे दिले?जि.परिषद निवडणुकीदरम्यान कायदा-सुव्यवस्था का मोडली?बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ का केली?पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश स्थगित कराजि.परिषद आवारात पाच हजार कार्यकर्ते कोणाच्या आदेशाने आले?

*उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक, शिवसेनेचे आमदार संतप्त!
शिवसेना मंत्री आणि आमदार साताऱ्यातील गैरप्रकाराविरोधात आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनाही घडलेल्या प्रकाराबाबत नाराजी बोलून दाखवली आहे. सत्ताधारी मंत्री आणि आमदारांनी मिळणारी दुय्यम वागणूक न खपणारी असल्याची नाराजी सर्वांनी उपमुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली आहे. तर, दुसरीकडे सभापती राम शिंदेनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निलंबन कारवाई निर्देश प्रकरणावरून मुख्यमंत्री आणि सभापतींमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here