‘एस आणि ‘टी’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार साक्षी दळवी या १० मते मिळवून विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुरेश शिंदे यांना ८ मते मिळाली. दोन मते अवैध ठरली.
‘एस आणि ‘टी’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून उपमहापौर संजय घाडी यांनी कामकाज सांभाळले.
स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे, उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे, एस विभागाच्या सहायक आयुक्त समरीन सय्यद, टी विभागाच्या सहायक आयुक्त योगिता कोल्हे आणि महानगरपालिका सचिव मंजिरी देशपांडे यावेळी उपस्थित होते.



















