Home मुंबई *राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन*

*राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे मुंबई येथे आगमन*

37
0

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे सोमवार दि. ९ रोजी पत्नी सुधा देव वर्मा यांचेसह मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भरती आदींनी त्यांचे स्वागत केले. मंगळवार दि. १० मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता नवनियुक्त राज्यपालांचा लोकभवन येथे शपथविधी होणार आहे.

*लोकभवन येथे स्वागत व मानवंदना*

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना सोमवारी महाराष्ट्र लोकभवन येथे आगमन प्रसंगी पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.

यावेळी पोलीस महासंचालक सदानंद दाते, पोलीस आयुक्त देवेन भरती, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here