सालाबादप्रमाणे यावर्षी देखील मराठी भाषा गौरव दिन उत्साहात मुलुंड विभागात साजरा करण्यात आला. कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांचा प्रतिमेला कार्यवाह भाग्यश्री नूलकर यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यानंतर महेश कवटकर यांनी साहित्य संमेलनातील अनुभव कथन केले. त्यानंतर दीनानाथ भिडे यांनी वर्ष २०२५ सालातील वाचलेल्या काही निवडक दिवाळी अंकातील लेखांचे विवेचन सोप्या भाषेत केले. त्यानंतर लक्ष्मण उपाध्ये यांनी मराठी भाषेशी निगडीत दैनदिन जीवनातील काही ठळक अशा विसंगती खुमासदार शैलीत सांगितल्या. त्यानंतर अस्मिता सुतार, रजनी साळुंखे, उल्हास कुळकर्णी यांनी कुसुमाग्रजांच्या काही निवडक कवितांचे वाचन केले.शरयू वैद्य यांनी काही आपल्या आठवणी वाचकांना सांगितल्या. विजया कापडी यांनी ज्ञानपीठ पुरस्काराच्या स्वरूपाविषयी सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शुभागी सिनकर यांनी कुसुमाग्रजांचे गीत गाण्याचा सुंदर असा प्रयत्न केला. आणि त्याला उपस्थित श्रोत्यांनी देखील उत्फूर्त अशी साथ दिली.त्यानंतर चिन्मय मायदेव यांनी लेख वाचन करून महारष्ट्रावर असलेला पोवाडा सदर केला. अशारीतीने कार्यक्रमाच्या शेवटी भाग्यश्री नूलकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत गोळे व कर्मचारीवर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

















