Home मुंबई *वेल्स संसद व ब्रिटन संसदीय संस्थांना भेट, महाराष्ट्र विधिमंडळ प्रतिनिधीचा अभ्यासदौरा*

*वेल्स संसद व ब्रिटन संसदीय संस्थांना भेट, महाराष्ट्र विधिमंडळ प्रतिनिधीचा अभ्यासदौरा*

52
0

*महाराष्ट्र विधानपरिषद सभापती राम शिंदे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा व वेल्स विधीमंडळ प्रतिनिधींचा समारोपात सहभाग*

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी २०२६ : महाराष्ट्र विधिमंडळाच्या माननीय सभापती व अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली १५ ते २१ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत युनायटेड किंगडममधील संसदीय व शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यात Commonwealth Parliamentary Association (CPA) मुख्यालय, लंडन तसेच University of Wales Trinity Saint David, लँपेटर (वेल्स) येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या दौऱ्यात सभापती प्रा. राम शिंदे व महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या ऊपस्थितीत वेल्स विधानसभा व ब्रिटन संसदेत समारोपाची सत्रे होणार आहेत.

*१९ फेब्रुवारी २०२६ (गुरुवार) च्या कार्यक्रमात*
कार्डिफ येथे सकाळी महाराष्ट्र आमदार प्रतिनिधीमंडळाची बैठक पार पडली. त्यानंतर प्रतिनिधीमंडळाने वेल्स संसद Senedd येथे भेट

* वेल्स सरकारचे शाश्वत विकास प्रमुख Lloyd Harris यांच्यासोबत बैठक
* वेल्स संसद आंतरराष्ट्रीय संबंध अधिकारी Al Davies यांनी संसद भवनाचा अभ्यासदौर्यात माहिती
* फ्युचर जनरेशन कमिशनर Derek Walker यांच्यासोबत “Managing Change” विषयावर प्रतिनिधींनी संवाद

*२० फेब्रुवारी २०२६ (शुक्रवार) कार्यक्रम :*

सकाळी कार्डिफहून लंडन येथे प्रयाण करून दुपारी वेस्टमिन्स्टर परिसरात यूके संसद भवन (Houses of Parliament) येथे ३ ते ४.३० या वेळेत अभ्यासदौरा आयोजित करण्यात आला.
* प्रा. Jeremy Smith (Dean, UWTSD) यांच्या मार्गदर्शनाखाली संसदीय कार्यपद्धतीची माहिती
* त्यानंतर वेस्टमिन्स्टर परिसरात संवाद व भेटीगाठी कार्यक्रम
* सायंकाळी National Liberal Club येथे आयोजित केलेल्या स्नेहभोजन व प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात सर्व सहभागी झाले.
* CPA चे डेप्युटी सेक्रेटरी जनरल Jarvis Matiya यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण
“या दौऱ्यामुळे आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम संसदीय पद्धतींचा अभ्यास, शैक्षणिक प्रशासन, संशोधन संसाधने, संस्थात्मक नेटवर्किंग आणि व्यावसायिक कौशल्यविकासाला चालना मिळणार असल्याचे, डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

महाराष्ट्र विधिमंडळ प्रतिनिधीमंडळाच्या या अभ्यास दौऱ्यात सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ. नीलम गो-हे ,मंत्री आदिती तटकरे, आ. बाबासाहेब देशमुख, आ. विश्वजीत कदम, आ. नमिता मुंदडा, आ.स्नेहा दुबे, आ. योगेश टिळेकर, आ. अमित गोरखे, आ. विक्रम पाचपुते, आ. विक्रांत पाटील, आ. सुमित वानखेडे, आ.मनीषा कायंदे, आ. निरंजन डावखरे, आ. वरुण सरदेसाई, आ. परिणय फुके, आ. विक्रम काळे व समन्वयक म्हणून चैतन्य मारपकवार ,अभ्यासु पत्रकार यांचा सहभाग आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here