Home मुंबई *मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज २०२६: आठ हवामान स्नेही नवोपक्रम विजेते घोषित*

*मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज २०२६: आठ हवामान स्नेही नवोपक्रम विजेते घोषित*

52
0

*राज्यपाल आचार्य देवव्रत, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते वितरण*

मुंबई, दि. १९ : हवामान बदलावरील उपायांना चालना देण्यासाठी मुंबई क्लायमेट वीकच्या समारोपाच्या दिवशी ‘MCW इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ च्या विजेत्यांची घोषणा केली. यामध्ये भारत आणि ग्लोबल साउथ (विकसनशील देश) मधील आठ उच्च-प्रभावी हवामान नवोन्मेषकांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये तरुणांनी विकसित केलेल्या दोन उपायांचाही समावेश आहे.

हे पुरस्कार समारोपाच्या सत्रात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी पर्यावरण आणि हवामान बदल मंत्री पंकजा गोपीनाथराव मुंडे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

यावर्षी ३५० हून अधिक स्टार्टअप्स आणि तरुण बदल घडवू पाहणाऱ्यांनी जलसंधारण, ऊर्जा कार्यक्षमता, मोबिलिटी, शाश्वत साहित्य आणि कार्बन अकाउंटिंग यांसारख्या क्षेत्रांत पुरस्कारासाठी अर्ज केले होते. अर्जांच्या छाननीनंतर, ३४ अंतिम स्पर्धकांनी (finalists) शेवटच्या फेरीत प्रवेश केला.

*MCW इनोव्हेशन चॅलेंज २०२६ चे विजेते*
निवडण्यात आलेले आठ विजेते हे भारतातील हवामान बदलाचा वेग कमी करण्यासाठी आणि लवचिकता मजबूत करण्यासाठी अत्यंत सक्षम आणि गुंतवणुकीसाठी तयार असलेले उपाय सुचविले आहेत.

*प्रमुख विजेते:*
* एनलॉग (Enlog)
* Temperate Technologies Private Limited
* Fitsol Supply Chain Solutions
* Indra Water
* Bambrew
* Torus Robotics

*युथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज विजेते (१६ ते २४ वयोगटातील तरुण):*
* EnviroWealth
* Decentralized Biochar Systems

*सहकार्य आणि भागीदारी*
हा उपक्रम नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (NSE) यांच्या सहकार्याने ‘इनोव्हेशन चॅलेंज पार्टनर’ म्हणून आणि सोशल अल्फा यांच्या सहकार्याने ‘सपोर्ट पार्टनर’ म्हणून आयोजित करण्यात आला होता. क्लायमेट कलेक्टिव्ह फाउंडेशन हे ‘क्लायमेट रि-डिझाइन चॅलेंज पार्टनर’ म्हणून सहभागी झाले होते.

तरुणांसाठीचे विशेष ‘युथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज’ हे युवाह (युनिसेफ) च्या भागीदारीत राबवण्यात आले. ज्यामध्ये अन्न प्रणाली, शहरी लवचिकता आणि ऊर्जा संक्रमण या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले.
या चॅलेंजमुळे केवळ विजेते निवडले गेले नाहीत, तर त्यांना क्षमता बांधणी, मार्गदर्शन आणि गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
0000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here