Home Trending Now छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनतर्फे लंडन येथे अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा

छत्रपती शिवाजी महाराज युथ असोसिएशनतर्फे लंडन येथे अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ शोकसभा

53
0

लंडन : छत्रपती शिवाजी महाराज युवक संघठनेतर्फे रविवारी लंडन येथे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ भावपुर्ण शोकसभेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा तसेच महाराष्ट्र भवन, लंडनसाठी जाहीर करण्यात आलेल्या ५ कोटी रुपयांच्या मदतीचाही उल्लेख करण्यात आला. त्यांच्या कार्याचा आढावा घेताना उपस्थितांनी विविध आठवणींना उजाळा दिला.

या कार्यक्रमाला लंडन व परिसरातील मराठी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्व. अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहिली.

मौनानंतर असोसिएशनचे अध्यक्ष धीरजसिंह तौर यांनी अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, विकासकामांबद्दलची बांधिलकी तसेच समाजासाठी केलेल्या कार्याची आठवण करून दिली.

या कार्यक्रमाच्या आयोजनात धीरजसिंह तौर, सुनिल पाटील, स्वराज मोहिते, आशुतोष धमले, स्वप्नील गावडे, पवन खरात, कौस्तुभ रमेकऱ, यशवंत गुरव, यश सुतार यांसह संघटनेतील सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच मराठी समाजातील अनेक मान्यवर व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम शांत, भावनिक आणि आदरपुर्ण वातावरणात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here