संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महापौर दालनातील संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस महापौर रितू राजेश तावडे यांनी रविवार दि १५ फेब्रुवारी २०२६ रोजी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी उप आयुक्त ( उद्याने) अजितकुमार आंबी, उप सचिव प्रियांका देसाई, बाजार निरीक्षक धर्मा राठोड, बॅंकेचे संचालक विजय जाधव उपस्थित होते.
***



















