Home Uncategorized *‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागमनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या...

*‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागमनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शालेय स्पर्धा, आरोग्य शिबिर आदी उपक्रमांचे आयोजन*

57
0

*• महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गायन, वक्तृत्व, निबंध, चित्रकला, वाचन स्पर्धा पार पडणार*

महाराष्ट्र शासनाचे अल्पसंख्याक विकास विभाग तसेच राज्यस्तरीय समागम समितीद्वारा ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागमचे दि. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी नवी मुंबई येथे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत शाळांमध्ये स्पर्धा आणि अन्य उपक्रमांचे तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य शिबिर आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

दि. २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते १० वाजेदरम्यान ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर, नवी मुंबई येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने महानगरपालिकेच्या शाळांमध्ये हिंद-दी-चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजी यांच्या जीवनप्रवासावर आधारित लघुपट दाखविण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी ला सदर लघुपट सर्व शाळांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. तसेच, दि. १३ ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गायन, वक्तृत्व, निबंध, चित्रकला, वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येईल.

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादुर साहिबजी ३५० वा शहीदी समागमनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमधून सर्वोत्कृष्ट १५ विद्यार्थी व ५ शाळांची निवड करण्यात येईल. विजेत्यांना मुख्यमंत्री, पालकमंत्री आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येईल.

दरम्यान, महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने मुंबईत विविध ठिकाणी आरोग्य आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे. नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा.” असे आवाहन उपायुक्त (परिमंडळ-६) संतोषकुमार धोंडे यांनी केले आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here